TRENDING:

'आम्ही हॉर्ट अटॅकने मरणं पसंत करू, पण...', अभिनेत्याचं महिलांबाबत वादग्रस्त विधान, उघडपणे व्यक्त केला राग

Last Updated:
Raghu Ram Controversy : 'रोडीज' मुळे प्रसिद्धीझोतात आलेला आणि आपल्या रोखठोकपणामुळे नेहमी वादात असणारा रघु राम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
advertisement
1/6
'आम्ही हॉर्ट अटॅकने मरणं पसंत करू, पण...',अभिनेत्याचं महिलांबाबत वादग्रस्त विधान
मुंबई: टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'रोडीज' मुळे प्रसिद्धीझोतात आलेला आणि आपल्या रोखठोकपणामुळे नेहमी वादात असणारा रघु राम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याने महिलांवर केलेल्या एका अत्यंत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधानामुळे नवा वाद उभा राहिला आहे. रघुने दावा केला आहे की, पुरुषांना होणाऱ्या अनेक मानसिक आणि शारीरिक समस्यांसाठी महिलाच जबाबदार आहेत.
advertisement
2/6
'टू गर्ल्स अँड टू कप्स' नावाच्या एका पॉडकास्टमध्ये बोलताना रघु रामने हे अत्यंत टोकाचे विधान केले. त्याने म्हटले की, ६० वर्षांनंतर अनेक पुरुषांचा मृत्यू हार्ट अटॅकने होतो किंवा ते आत्महत्या करतात, कारण हे सर्व ते कोणत्या प्रकारच्या महिलांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत यावर अवलंबून असते.
advertisement
3/6
रघुने 'रोडीज'मधील काही महिला स्पर्धकांचा अनुभवही सांगितला. तो म्हणाला, "रोडीजमध्ये काही महिला होत्या, ज्यांच्यामुळे आमच्या कानातून धूर निघायचा. महिला जेंटल नसतात. पुरुष जेव्हा भांडतात, तेव्हाही एक मर्यादा असते. पण महिलांमध्ये ती मर्यादा नसते. त्या इतक्या ओरडतात आणि जे बोलतात, ते खूप दुखावणारे असते. आम्ही खूप घाबरून जातो."
advertisement
4/6
रघु रामने दावा केला की, स्त्रिया भावनिकदृष्ट्या उघड असलेल्या पुरुषांची मागणी करतात, पण प्रत्यक्षात त्या तसे पुरुष स्वीकारत नाहीत. तो म्हणाला, "ज्यावेळी एखादा पुरुष भावनिक होतो, तेव्हा त्या त्याला झिडकारतात आणि म्हणतात, 'तू तर मुलीसारखा आहेस. तुझ्याबद्दलचा आदर संपला.' यामुळेच पुरुष त्यांच्या समस्या शेअर करत नाहीत."
advertisement
5/6
रघु रामने अत्यंत टोकाचे मत मांडले, "आम्ही ६० व्या वर्षी हार्ट अटॅकने मरायला आनंदी आहोत. बायपास सर्जरी होईल, आम्ही ते सहन करू, पण कोणत्याही महिलेसमोर आम्ही आमच्या कमजोर क्षणाचे लक्षण दाखवणार नाही, कारण जेव्हा पुरुष असे करतात, तेव्हा महिला त्याचा उपयोग त्यांच्या विरोधात करतात."
advertisement
6/6
रघु रामने 'रघु बॉक्स' या त्याच्या यूट्युब चॅनलवर एका महिलेच्या कमेंटचे उदाहरण दिले. त्या महिलेने म्हटले होते की, जे पुरुष कमवत नाहीत, त्यांचा ती आदर करणार नाही. रघु रामने यावर प्रश्न केला, "जर आम्ही म्हटले की, ज्या महिला सुंदर नाहीत, त्या आमच्या प्रेमाला पात्र नाहीत? जसे आम्ही मोठे होतो, तशी आमची कमवण्याची क्षमता वाढते. तुमचं सौंदर्य कमी होतं. मग? आम्ही कधी ती अट ठेवली का?" रघुने स्पष्ट केले की, पुरुषांनी कमवू नये असे त्याला म्हणायचे नाही, पण महिलांचा आदर त्यांच्या कमाईवर अवलंबून असावा, यावर त्याचा आक्षेप आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'आम्ही हॉर्ट अटॅकने मरणं पसंत करू, पण...', अभिनेत्याचं महिलांबाबत वादग्रस्त विधान, उघडपणे व्यक्त केला राग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल