TRENDING:

तोच चेहरा, तेच डोळे, तिच स्माइल! 90s च्या या अभिनेत्रीला पाहून माधुरीही होईल थक्क, अनिल-शाहरुख सोबत केलाय पिक्चर

Last Updated:
Madhuri Dixit Lookalike : माधुरी दीक्षित सारखी दिसणाऱ्या या अभिनेत्रीला तुम्ही पाहिलंय का? तोच चेहरा, तेच डोळे, तिच स्माइल, डिट्टो माधुरीच, तिला पाहून माधुरीही थक्क होईल.
advertisement
1/9
तोच चेहरा,तेच डोळे,तिच स्माइल! 90sच्या या अभिनेत्रीला पाहून माधुरीही होईल थक्क
'मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हू'  असे अनेकांना वाटत होतं, पण कोणीच माधुरीची जागा घेऊ शकलं नाही. बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने तिच्या अभिनय, डान्स आणि अदाकारीनं लाखो लोकांची मनं जिंकली.
advertisement
2/9
पण तुम्हाला माहीत आहे का माधुरीसारखीच दिसणारी आणखी एक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये होती. 90 च्या दशकात तिने शाहरुख खानबरोबर सिनेमा केला होता.
advertisement
3/9
ही अभिनेत्री दिसायला हुबेहूब माधुरीसारखी, तिची हेअर स्टाइल, हिचे डोळे, लुक्स सगळं काही माधुरीसारखे. तिचा संपूर्ण चेहरा माधुरीशी मिळताजुळता. माधुरीची जुळी बहीण म्हटले तर वावगे ठरणार नाही. अनेक वर्षांनी या अभिनेत्रीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
4/9
निकी वालिया असे या अभिनेत्रीचं नाव आहे. ती फक्त माधुरीसारखी दिसायला नव्हती तर ती तितकीच टॅलेंटेड देखील होती. अनिल कपूरच्या 'मिस्टर आझाद' या सिनेमातून तिनं डेब्यू केला. त्यानंतर तिने शाहरुख खानच्या 'यस बॉस' सिनेमात काम केलं. हा सिनेमा सुपरहिट सिनेमांपैकी एक होता.
advertisement
5/9
त्यानंतर निकीनं टेलिव्हिजनमध्ये एन्ट्री केली. तिनं अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले. 90 च्या दशकात निकीच्या अदांनी आणि स्माइलनं सगळ्यांची मने जिंकली. लोक तिला छोटी माधुरी दीक्षित म्हणायचं. ती देखील ते सगळं खूप एन्जॉय करत होती.
advertisement
6/9
निकीने दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते, "सिनेमात काम करायला लागल्यानंतर लोक एका महिलेला एखाद्या वस्तू प्रमाणे पाहतात असा वाटायला लागलं."
advertisement
7/9
मिस्टर आझादच्या सेटवर पहलाज निहलानी यांनी तिला डिस्ट्रीब्युटर्सबरोबर डिनर करायला सांगितले होते. तिने नकार दिला आणि निहलानी यांनी सांगितले, पिक्चर विकायचा नाहीये का? त्यानंतर मला अभिनय सोडून देण्याची इच्छा झाली होती, असंही ती म्हणाली.
advertisement
8/9
निकी पुढे म्हणाली, "मी ती फिल्म केली आणि त्यामुळे मला शाहरुख खानबरोबर यस बॉसमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पण सिनेमाच्या शूटिंगवेळी माझ्या वडिलांचे निधन झालं. मी प्रोड्युसरकडे गेले आणि पैसे परत केले." त्यानंतर निकीचे लग्न झालं आणि नवऱ्यासोबत ती यूकेला शिफ्ट झाली.
advertisement
9/9
निकी वालिया आता युकेमध्ये असते. अनेकदा ती भारतातही येते. सोशल मीडियावर ती सक्रीय असते. अनेक व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. आजही तिचे अनेक लुक्स माधुरी दीक्षित सारखे आहेत. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
तोच चेहरा, तेच डोळे, तिच स्माइल! 90s च्या या अभिनेत्रीला पाहून माधुरीही होईल थक्क, अनिल-शाहरुख सोबत केलाय पिक्चर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल