TRENDING:

Madhuri Dixit: माधुरी दिक्षितचं ते डबल मीनिंग गाणं, संसदेत राडा पण कमाई बंपर, विकल्या तब्बल 1 कोटी कॅसेट!

Last Updated:
Madhuri dixit double meaning song: बॉलिवूडची डान्स क्वीन आणि सुंदर अदाकारा माधुरी दिक्षितने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिने अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मात्र माधुरीचं 1993 एक डबल मीनिंग गाणं रिलीज झालं होतं ज्याने सगळीकडे खळबळ उडवली होती.
advertisement
1/8
माधुरीचं ते डबल मीनिंग गाणं, संसदेत राडा, कमाई बंपर, विकल्या तब्बल 1 कोटी कॅसेट
बॉलिवूडची डान्स क्वीन आणि सुंदर अदाकारा माधुरी दिक्षितने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिने अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मात्र माधुरीचं 1993 एक डबल मीनिंग गाणं रिलीज झालं होतं ज्याने सगळीकडे खळबळ उडवली होती.
advertisement
2/8
1993 मध्ये सुभाष घई यांचा 'खलनायक' सिनेमा रिलीज झाला होता. यामध्ये संजय दत्त आणि माधुरी दिक्षीत होते. 90 च्या दशकातील सर्वात हिट सिनेमांपैकी एक हा होता. यातील एका गाण्यावरून बराच गदारोळ झाला होता. या गाण्यावरही बंदी घालण्यात आली होती.
advertisement
3/8
'खलनायक' सिनेमातील हे गाणं 'चोली के पीचे क्या है' आहे. हे गाणे सरोज खान यांनी कोरिओग्राफ केले होते. हे गाणं रिलीज झालं तेव्हा सगळेच शॉक झाले. कारण यात डबल मीनिंग होता. गाण्याबद्दल इतकी अस्वस्थता होती की सुमारे 32 संघटनांनी गाण्यावर आक्षेप घेतला. हे गाणे त्यावेळी चर्चेत होते.
advertisement
4/8
माधुरी दीक्षितवर चित्रित केलेल्या या गाण्यावरून जेवढे वाद निर्माण झाले, तेवढंच ते लोकप्रियही झालं. या गाण्याच्या म्युझिक अल्बमने अवघ्या एका आठवड्यात एक कोटी कॅसेट विकल्या, हा त्यावेळचा मोठा रेकॉर्ड होता. तेव्हा या गाण्याची सर्वाधिक चर्चा झाली होती. अलका याज्ञिक आणि इला अरुण यांनी हे सुपरहिट गाणे गायलं.
advertisement
5/8
30 वर्षांपूर्वी हे गाणे देशातील सर्वात वादग्रस्त गाणं ठरलं होतं. हे गाणं देशाच्या संसदेत पोहोचलं होतं. असे असूनही, हे गाणे रिलीज झाले आणि ते बॉलिवूडमधील आयकॉनिक गाण्यांपैकी एक बनलं.
advertisement
6/8
अवघ्या 1 आठवड्यात या गाण्याच्या 1 कोटींहून अधिक कॅसेट विकल्या गेल्या. या गाण्याच्या कॅसेटला बाजारात मागणी वाढू लागली. या गाण्याने खलनायक हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. संजय दत्तच्या बबलूच्या पात्राने लोकांची मने जिंकली होती. या गाण्याने माधुरी दीक्षितला रातोरात सुपरस्टार बनवलं.
advertisement
7/8
या गाण्यात माधुरी दीक्षितने नीना गुप्तासोबत डान्स केला होता. नीना गुप्ता यांनीही त्यांच्या आत्मचरित्रात या गाण्याबद्दल बरेच काही सांगितले आहे. या गाण्याने त्यावेळी सर्वांना मागे टाकले आणि सुपरहिटचे बिरुद मिळवले.
advertisement
8/8
संजय दत्त आणि माधुरी दीक्षित स्टारर चित्रपटात संजय दत्त आणि माधुरीची जोडी खूप आवडली होती. या गाणं ज्येष्ठ लेखक आनंद बक्षी यांनी लिहिलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Madhuri Dixit: माधुरी दिक्षितचं ते डबल मीनिंग गाणं, संसदेत राडा पण कमाई बंपर, विकल्या तब्बल 1 कोटी कॅसेट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल