TRENDING:

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी लग्नबंधनात, कोण आहे त्याची रिअल लाइफ शिवाली?

Last Updated:
महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता निमिष कुलकर्णीने नुकतंच लग्न केलं. त्याची रिअल लाईफ शिवाली कोण आहे माहितीये? मराठी मालिकाविश्वाशी तिचं खास रिलेशन आहे.
advertisement
1/7
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष लग्नबंधनात,कोण आहे त्याची रिअल लाईफ शिवाली?
डिसेंबर महिन्यात अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली. सूरज चव्हाण, सोहम बांदेकर-पूजा बिरारी आणि प्राजक्ता गायकवाड यांच्या लग्नानंतर आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता निमिष कुलकर्णीने देखील लग्न केलं आहे. नुकताच निमिषचा लग्नसोहळा पार पडला. निमिषच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  
advertisement
2/7
अभिनेता निमिषच्या लग्नाचीही जोरदार चर्चा सुरू होती. त्याच्या लग्नाआधीच्या सगळ्या विधींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याच्या लग्नाला महाराष्ट्राची हास्यजत्राची टीम तसंच टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक कलाकारा मंडळींनी हजेरी लावली होती.  
advertisement
3/7
काही महिन्यांपूर्वीच निमिषचा साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर चाहत्यांना त्याच्या लग्नाची उत्सुकता होती. अखेर निमिषने त्याच्या रिअल लाईफ शिवालीबरोबर लग्नगाठ बांधली असून दोघांनी मोठ्या थाटात लग्न केलं. निमिषच्या लग्नातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
4/7
निमिषच्या बायकोनं लग्नात नारंगी रंगाची साडी, हिरव्या बांगड्यांचा चुडा, मुंडावळ्या आणि नथ असा पारंपरिक पोषाख केला होता. या लूकमध्ये कोमल अतिशय सुंदर दिसत होती. तर निमिषही पारंपरिक वेषात देखणा दिसत होता. लग्नाला शिवाली परब, अमृता माळवदकर, स्वानंदी बेर्डे, प्रथमेश शिवलकर यांसारख्या कलाकारांनी निमिषच्या लग्नाला उपस्थिती लावली होती. 
advertisement
5/7
महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये निमिष आणि शिवाली यांचं स्किट खूप हिट झालं. शिवाली हे खरं काय? हा डायलॉग चांगलाच फेमस झाला. निमिष आणि शिवाली यांची जोडी हिट झाली. पण निमिषची रिअल लाईफ शिवाली कोण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.  
advertisement
6/7
निमिषच्या रिअल लाईफ शिवालीचं म्हणजेच बायकोचं नाव कोमल आहे. ती मराठी मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहे. अनेक मालिकांची ती क्रिएटिव्ह हेड म्हणून जबाबदारी सांभाळते. 'लाखात एक आमचा दादा', 'दार उघड बये' सारख्या मालिकेची क्रिएटिव्ह हेड म्हणून कोमलने उत्तम कामगिरी केली होती.
advertisement
7/7
‘हास्यजत्रा’मुळे लोकप्रिय झालेल्या निमिषने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. काही महिन्यांपूर्वी तो अभिनेत्री सई ताम्हणकरसोबत 'अग्नी' या बॉलिवूड सिनेमातही झळकला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी लग्नबंधनात, कोण आहे त्याची रिअल लाइफ शिवाली?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल