14 वर्षीय मुलीच्या प्रेमात पडलेले महेश भट्ट, रक्ताने लिहायचे पत्र; शेवट झाला भयंकर
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Mahesh Bhatt : महेश भट्ट यांनी आपल्या लेकीला सांगितले की त्यांची पहिली पत्नी लॉरेन एका अनाथाश्रमात राहायची. पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर ते आजही तिची तेवढीच काळजी घेतात.
advertisement
1/7

दिग्गज सिने-दिग्दर्शक महेश भट्ट यांनी अलीकडेच त्यांची पहिली पत्नी लॉरेन भट्ट आणि त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. महेश भट्ट यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव किरण भट्ट असे ठेवले होते. किरण यांच्यापासून त्यांना पूजा आणि राहुल भट्ट ही दोन मुले झाली.
advertisement
2/7
महेश भट्ट यांची किरण भट्ट यांच्याशी पहिली भेट तेव्हा झाली होती तेव्हा किरण फक्त 14 वर्षांच्या होत्या आणि महेश स्वतः 16 वर्षांचे होते. महेश भट्ट आपल्या एका जवळच्या माणसामार्फत लॉरेनला स्वतःच्या रक्ताने लिहिलेली प्रेमपत्रं पाठवत असत. एका पॉडकास्टमध्ये आपली लेक पूजा भट्टसोबत बोलताना महेश भट्ट यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक रंजक गोष्टी सांगितल्या. तसेच काही धक्कादायक खुलासेही केले.
advertisement
3/7
महेश भट्ट आपल्या मुलीला म्हणाले की, त्यांची पहिली पत्नी लॉरेन एका अनाथाश्रमात राहायची. विशेष म्हणजे पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर आजही ते तिची तेवढीच काळजी घेतात. या मुलाखतीत महेश भट्ट यांनी आपली दुसरी पत्नी आणि आलियाची आई सोनी राजदान यांच्या लग्नाबाबतही भाष्य केलं.
advertisement
4/7
लॉरेनसोबतच्या पहिल्या भेटीबद्दल बोलताना महेश भट्ट म्हणाले,"मी फक्त 16 वर्षांचा होतो आणि ती 14 वर्षांची. ती एका अनाथाश्रमात राहत होती. तिच्या आईजवळ एवढे पैसे नव्हते की तिला एखाद्या चांगल्या शाळेत किंवा बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवता येईल. एक दिवस माझी नजर लॉरेनवर पडली. ती आपल्या शाळेतील मैत्रिणींसोबत बॉम्बे स्कॉटिश स्कूलच्या गेटजवळ उभी होती. लॉरेन खूपच सुंदर होती आणि हीच गोष्ट मला तिच्याकडे आकर्षित करत होती. पण मला सतत असं वाटत होतं की मी तिच्या योग्यतेचा नाही. म्हणूनच तिला भेटायला मला खूप वेळ लागला."
advertisement
5/7
महेश भट्ट पुढे म्हणाले,"एक दिवस खूप हिंमत करुन मी तिच्याकडे गेलो. माझ्याबद्दल सांगितलं. आजही मला आठवतं की पहिल्या भेटीत मी तिला सुपारी ऑफर केली होती". महेश भट्ट यांना पहिल्याच भेटीत लॉरेनने प्रभावित केलं होतं. त्यानंतर एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत मी लॉरेनला पुन्हा-पुन्हा भेटत राहिलो".
advertisement
6/7
महेश भट्ट म्हणतात,"शाळेचा ड्रेस शिवणाऱ्या त्या व्यक्तीला मी माझी प्रेमपत्रं लॉरेनपर्यंत पोहोचवण्याची विनंती केली. पण या सगळ्यात गडबड होण्याची शक्यता असल्याचं त्याने मला सांगितलं होतं. कारण तो एक चांगला व्यक्ती होता. जर पकडला गेला असता तर त्याची वाट लागली असती. पण तरीही त्याने माझ्याकडून प्रेमपत्रं घेतली आणि लॉरेनला दिली. लॉरेनला मी रक्ताने प्रेमपत्रं लिहिली. तर समोरुनही रक्ताने लिहिलेलंच प्रेमपत्रं आलं होतं".
advertisement
7/7
एक दिवस लॉरेन आणि महेश एका वर्गात भेटले. शाळेतील गेट सुरू ठेवण्यासाठी महेश भट्ट यांनी सूरक्षासक्षकाला पैसे दिले होते. त्यावेळी वर्गात अंधार असल्याने महेश भट्ट यांनी आगपेटीची एक काडी पेटवली. अखेर एक दिवस प्रेमपत्रं पाठवताना लॉरेन पकडला गेला. त्याला शाळेतून काढलं आणि सगळं काही संपलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
14 वर्षीय मुलीच्या प्रेमात पडलेले महेश भट्ट, रक्ताने लिहायचे पत्र; शेवट झाला भयंकर