'पुन्हा शिवाजीराजे भोसले'च्या रिलीजआधी महेश मांजरेकर साईचरणी लीन; पाहा PHOTO
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Mahesh Manjrekar Visit Shirdi Sai Baba Samadhi : 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाच्या रिलीजआधी महेश मांजरेकर यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं आहे.
advertisement
1/7

1. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट येत्या 31 ऑक्टोबर 2025 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या रिलीजआधी महेश मांजरेकरांनी सिनेमाच्या संपूर्ण टीमसह शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं आहे.
advertisement
2/7
'पुन्हा शिवाजीराजे भोसले'च्या संपूर्ण टीमने साईदरबारी नतमस्तक होऊन सिनेमाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद घेतले.
advertisement
3/7
महेश मांजरेकरांनी 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाचे पोस्टर साई समाधीवर ठेवत सिनेमाच्या यशासाठी प्रार्थना केली.
advertisement
4/7
साई दर्शनानंतर प्रतिक्रिया देताना महेश मांजरेकर म्हणाले,"पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट मनोरंजनासाठी नव्हे तर महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडलेल्या प्रत्येक माणसाला विचार करायला भाग पाडणारा आहे".
advertisement
5/7
महराष्ट्रतील शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या शिवरायांचा अनोखा प्रवास 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.
advertisement
6/7
सध्याच्या काळातील शेतकऱ्यांची स्थिती पाहून महाराज किती संतप्त होऊ शकतात, हे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाचा असल्याचं, महेश मांजरेकर म्हणाले होते.
advertisement
7/7
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटात शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका सिद्धार्थ बोडकेने साकारली आहे. तर राष्ट्रीय पुरस्कार विजेते त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप हे कलाकारही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'पुन्हा शिवाजीराजे भोसले'च्या रिलीजआधी महेश मांजरेकर साईचरणी लीन; पाहा PHOTO