Tharal Tar Mag : 'ठरलं तर मग'ला मिळाली नवी पूर्णा आजी, ज्योती चांदेकरांच्या जागी रोहिणी हट्टंगडी, फर्स्ट लुक
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Rohini Hatagdi Replace Jyoti Chandekar : अभिनेत्री ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर 'ठरलं तर मग' मालिकेला नवी पूर्णा आजी भेटली आहे. नव्या पूर्णाआजीचा पहिला लुक समोर आला आहे.
advertisement
1/9

मराठी टेलिव्हिजनवरील सध्याची सर्वात हिट मालिका म्हणजे ठरलं मग. या मालिकेतील सर्वच पात्र हिट झाली. त्यातही पूर्णा आजींची भूमिका विशेष गाजली.
advertisement
2/9
काही दिवसांआधी पूर्णाआजींची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं. त्यानंतर मालिकेतून पूर्णा आजींचं कॅरेक्टर गायब करण्यात आलं होतं.
advertisement
3/9
ज्योती चांदेकर यांचं निधन झाल्यानंतर आता नवी पूर्णा आजी कोण असा प्रश्न सर्वांना पडला होता. अखेर ठरलं तर मग मालिकेला नवी पूर्णा आजी भेटली असून पूर्णाआजीचा पहिला लुक समोर आला आहे.
advertisement
4/9
अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचा निधानानंतर ठरलं तर मग मालिकेच्या कलाकारांना मोठा धक्का बसला होता. ज्योती चांदेकर यांनी पूर्णा आजींची भूमिका उत्तमरित्या पार पाडली होती.
advertisement
5/9
त्यांच्यानंतर आता ही भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता सर्वांना होती. अनेक अभिनेत्रींची नावं पूर्णा आजीच्या भूमिकेसाठी चर्चेत होती.
advertisement
6/9
नुकताच ठरलं तर मग मालिकेचा प्रोमो समोर आला होता ज्यात नव्या पूर्णा आजीची एन्ट्री दाखवण्यात आली होती. डोक्यावर पदर घेत पूर्णा आजी घरात प्रवेश करतात असं दाखवण्यात आलं होतं. पण चेहरा दाखवण्यात आला नव्हता. अखेर नव्या पूर्णा आजीचं नाव आणि चेहरा समोर आला आहे.
advertisement
7/9
गेले कित्येक दिवस पूर्णा आजी या पात्राला प्रेक्षक मिस करत होते. प्रेक्षकांच्या इच्छेखातर पूर्णा आजी पुन्हा आपल्या भेटीला येणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी पूर्णा आजीची भूमिका साकारणार आहेत.
advertisement
8/9
पूर्णा आजींची भूमिका साकारण्याबाबत रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या, "ठरलं तर मग मालिका माझी आवडती मालिका आहे आणि मी न चुकता पहाते. याच मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणार आहे."
advertisement
9/9
"कलाकाराने ती भूमिका एका पातळीवर नेऊन ठेवलेली असते. त्या कलाकाराने केलेलं काम पुढे न्यायचं थोडं जबाबदारीचं काम आहे. माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करणार आहे. प्रेक्षकांनी तितक्याच दिलदारपणे स्वीकारावं ही इच्छा आहे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Tharal Tar Mag : 'ठरलं तर मग'ला मिळाली नवी पूर्णा आजी, ज्योती चांदेकरांच्या जागी रोहिणी हट्टंगडी, फर्स्ट लुक