Mrunal Dusanis: 'दिसते साधी पण मी खूप...', शांत, सरळ दिसणारी मृणाल दुसानीस खऱ्या आयुष्यात कशी?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Mrunal Dusanis: मराठी छोट्या पडद्यावर गोड, शांत, सरळ स्वभावाची भूमिका साकारणारी अभिनेत्री मृणाल दुसानीस खऱ्या आयुष्यात मात्र थोडीशी वेगळी आहे. चार वर्षांच्या ब्रेकनंतर पुनरागमन करणाऱ्या मृणालने तिच्या खऱ्या स्वभाविषयी सांगितलं आहे.
advertisement
1/7

मराठी छोट्या पडद्यावर गोड, शांत, सरळ स्वभावाची भूमिका साकारणारी अभिनेत्री मृणाल दुसानीस खऱ्या आयुष्यात मात्र थोडीशी वेगळी आहे. चार वर्षांच्या ब्रेकनंतर पुनरागमन करणाऱ्या मृणालने तिच्या खऱ्या स्वभाविषयी सांगितलं आहे.
advertisement
2/7
‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतील कावेरीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली मृणाल ही प्रेक्षकांच्या मनात आजही कायम आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वामध्ये एक गोडसर साधेपणा आहे. पण अलीकडे दिलेल्या मुलाखतीत मृणालने कबूल केलं – “मी तापट स्वभावाची आहे, मला पटकन राग येतो.” हे ऐकून अनेक चाहते थक्क झाले.
advertisement
3/7
‘सुलेखा तळवलकर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मृणालने सांगितलं, “रागामुळे माझ्या अनेक गोष्टी बिघडतात. मी खूप भावना मनात साठवते आणि मग स्फोट होतो.” त्यामुळे पडद्यावरची मृणाल आणि रिअल लाइफ मृणालच्या स्वभावाच बराच फरक आहे.
advertisement
4/7
मृणालने तिच्या बालपणाबद्दल बोलताना सांगितलं की, “आई-बाबा हेच माझं विश्व होतं. मी फारशी मैत्रिणी जोडल्या नाहीत. मला बाहेरच्या जगाची फारशी गरज वाटली नाही.” एक साधं पण नात्यांमध्ये खोलपणा असलेलं बालपण तिने अनुभवलं.
advertisement
5/7
‘तू तिथे मी’, ‘असं सासर सुरेख बाई’, ‘हे मन बावरे’ यांसारख्या मालिकांमधून मृणालने तिचं अभिनयकौशल्य दाखवलं. दरम्यान चार वर्षांची विश्रांती घेतल्यानंतर ती ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांसमोर आली आहे.
advertisement
6/7
4 वर्षांनी पुनरागमन केल्यावरही प्रेक्षकांनी तिला तेवढंच प्रेम आणि शुभेच्छा दिल्या. प्रेक्षकांनी पुन्हा एकदा तिचं प्रेमाने स्वागत केलं आहे. तिचे चाहते तर तिला पुन्हा पडद्यावर पाहून आनंदी झाले.
advertisement
7/7
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतून मृणाल सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तिची ही भूमिकादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेत ती नंदिनीची भूमिका साकारत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Mrunal Dusanis: 'दिसते साधी पण मी खूप...', शांत, सरळ दिसणारी मृणाल दुसानीस खऱ्या आयुष्यात कशी?