90 ची सुपरहिट मराठी अभिनेत्री, भंगारवाल्याला देऊन बसली अस्सल हिऱ्याचे कानातले, काय आहे 'हा' किस्सा!
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Marathi Actress : मराठी अभिनेत्रीने बालपणी भंगारवाल्याला हिऱ्याचे कानातले दिले होते.
advertisement
1/7

हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या गुणी अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी बालपणी चक्क भंगारवाल्याला हिऱ्याचे कानातले दिले होते.
advertisement
2/7
निशिगंधा वाड लहान असताना त्यांच्या घरी भंगार नेण्यासाठी एक वयस्कर व्यक्ती आलेली. त्यावेळी त्या वयस्कर व्यक्तीला पाहून, त्यांची परिस्थिती पाहून छोट्या निशिगंधाला दया आली. आपण त्या आजोबांना आर्थिक मदत केली पाहिजे, असं त्यांना वाटलं आणि त्या हेतूने त्यांनी चक्क कपाटात ठेवलेले हिऱ्याचे कानातले त्या भंगार नेण्यासाठी आलेल्या या वयस्कर व्यक्तीला दिले.
advertisement
3/7
आईला कपाटात कानातले दिसले नाहीत तेव्हा त्यांनी शोधाशोध सुरु केली. घरात पूर्ण गोंधळ सुरू होता. त्यांची आई रडकुंडीला आलेली. कारण निशिगंधा वाड यांच्या आजीने त्यांच्या आईला हे कानातले दिले होते.
advertisement
4/7
सुरुवातीला आईला कसं सांगायचं याचं धाडस त्यांना निशिगंधा वाड यांना होत नव्हतं. पण पुढे आईनेच त्यांना बोलतं केलं होतं. रडकुंडीला आलेली आई पाहून निशिगंडा वाड यांनी आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांची आईदेखील हैराण झाली.
advertisement
5/7
पुढे अनेक दिवस ते त्या व्यस्कर व्यक्तीची वाट पाहत होते. अखेर एक दिवस ते व्यस्कर व्यक्ती पुन्हा ते हिऱ्याचे कानातले घेऊन निशिगंधा वाड यांच्या घरी आले आणि त्यांच्याआईकडे ते कानातले सुपूर्द केले.
advertisement
6/7
वयस्कर व्यक्ती निशिगंधा वाड यांच्या आईला म्हणाली,"तुमच्या लेकीने मला दिले होते. पण काही दिवस आजारपणामुळे मला तुमच्या घरी येता आलं नाही. मी एक वारकरी माणूस आहे. हे परत केलं नसतं तर पांडुरंगाला ताय तोंड दाखवू शकलो असतो. मुलीला ओरडू नका".
advertisement
7/7
घर संसार, शेजारी शेजारी, बाळा जो जो रे, प्रेमांकूर, माणूस, नवरा माझ्या मुठीत गं, गृहप्रवेश, बंधन, वाजवा रे वाजवा, रंग प्रेमाचे, जन्मठेप, लई झकास यांसारख्या अनेक सिनेमांमधून निशिगंधा वाड प्रेक्षकांची मन जिंकत आल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
90 ची सुपरहिट मराठी अभिनेत्री, भंगारवाल्याला देऊन बसली अस्सल हिऱ्याचे कानातले, काय आहे 'हा' किस्सा!