4 ते 18 ऑक्टोबरदरम्यान राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी केले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि काम सुरळीत पार पाडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, प्रशासनाने यासंबंधीची तयारी पूर्ण केली आहे.
आईनं पै-पै करून घर घेतलं, पोटच्या लेकानं तिलाच हाकललं..., छ. संभाजीनगरात असा झाला न्याय!
advertisement
बंद राहणारा मार्ग
कचनेर – निलजगाव – बिडकीन डीएमआयसी – निलजगाव फाटा – बिडकीन मार्गे छत्रपती संभाजीनगर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
पर्यायी मार्ग
छत्रपती संभाजीनगरहून वाळूज, कचनेर किंवा पैठणकडे जाणारी वाहने आणि त्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्गांचा वापर सुचवण्यात आला आहे. या मार्गांवर वाहतूक पोलीस आणि स्थानिक प्रशासनामार्फत आवश्यक त्या दिशा फलकांची व नियंत्रण यंत्रणेची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रशासनाचे आवाहन
या वाहतूक बदलामुळे प्रवासात काहीसा वेळ अधिक लागू शकतो. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना अधिक सुलभ आणि सुरक्षित प्रवासाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.