TRENDING:

Prajakta Mali : 'त्यांनी माझे VIDEO...', प्राजक्ता माळीसोबत सोशल मीडियावर घडला किळसवाणा प्रकार, म्हणाली...

Last Updated:
सोशल मीडियावर वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांवर बोलताना, प्राजक्ताने तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला, ज्यामुळे आता सोशल मीडियाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
advertisement
1/9
'त्यांनी माझे VIDEO...', प्राजक्ता माळीसोबत सोशल मीडियावर घडला किळसवाणा प्रकार
मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील लाडकी आणि लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या अभिनयापेक्षा एका गंभीर कारणामुळे चर्चेत आहे.
advertisement
2/9
सोशल मीडियावर वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांवर बोलताना, प्राजक्ताने तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला, ज्यामुळे आता सोशल मीडियाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
advertisement
3/9
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या प्राजक्ताने नुकताच ‘MHJ Unplugged’ मध्ये संवाद साधला. यावेळी तिला सोशल मीडियाच्या वापराबद्दल विचारले असता, तिने एक खूप महत्त्वाचं सत्य समोर आणलं.
advertisement
4/9
प्राजक्ता म्हणाली, “मला आयुष्यात कशाचीच भीती वाटत नव्हती, पण आता मला खरंच सोशल मीडियाची भीती वाटू लागली आहे.” तिने एका सायबर क्राईम महासंचालकांना भेटल्याची गोष्ट सांगितली, जिथे तिला एका वेगळ्याच गुन्ह्याबद्दल माहिती मिळाली.
advertisement
5/9
सायबर पोलिसांनी पकडलेल्या दोन मुलांचं वय साधारण १९-२० वर्षं होतं. त्यांना ते आयुष्यात नेमकं काय करत आहेत, याची जाणीवही नव्हती.
advertisement
6/9
प्राजक्ताने पुढे सांगितलेला किस्सा अधिक धक्कादायक आहे. त्या पोलिसांनी एका मुलाला प्राजक्ताला फोन लावून दिला होता. प्राजक्ताने त्या मुलाला विचारलं, “तू असं का केलंस?”
advertisement
7/9
त्या मुलाने एक प्रोफाइल उघडलं होतं, ज्यात फक्त प्राजक्ताचे खराब व्हिडिओ होते. यावर त्या मुलाने जे उत्तर दिलं, ते ऐकून प्राजक्ता स्तब्ध झाली. तो म्हणाला, “तुम्ही ट्रेंडिंगमध्ये होतात म्हणून.”
advertisement
8/9
खरं तर, तो मुलगा प्राजक्ताचा चाहता होता, पण त्याने काहीही टाकून प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे कृत्य केलं होतं. त्याने केलेल्या कृत्याची त्याला नंतर जाणीव झाली. त्याने प्राजक्ताला विनंती केली की, “प्लीज माझ्या घरी सांगू नका, माझे वडील मला चाबकाने मारतील.”
advertisement
9/9
या सगळ्या अनुभवानंतर, प्राजक्ताने सर्वांना एक कळकळीचं आवाहन केलं आहे की, सोशल मीडियावर तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कधीही पोस्ट करू नका.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Mali : 'त्यांनी माझे VIDEO...', प्राजक्ता माळीसोबत सोशल मीडियावर घडला किळसवाणा प्रकार, म्हणाली...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल