OTT गाजवणाऱ्या मराठी अभिनेत्रीला कॅन्सर! हॉस्पिटलमधील PHOTO; म्हणाली, 'सर्जरीनंतर माझ्या...'
- Published by:Priya Lad
Last Updated:
Marathi Actress Breast Cancer : मराठी अभिनेत्री ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाला आहे. तिने स्वत: आपला हॉस्पिटलमधील फोटो पोस्ट करत तिच्या आजाराबाबत माहिती दिली आहे.
advertisement
1/7

ओटीटी </a>गाजवणारी मराठी अभिनेत्री, तिला कॅन्सरचं निदान झालं आहे. अभिनेत्रीने स्वत:च आपल्याला कॅन्सर झाल्याचं सांगितलं आहे. तिने हॉस्पिटलमधील आपला फोटोही पोस्ट केला आहे. पोस्टमध्ये तिने आपल्या आरोग्याबाबतची माहिती दिली आहे." width="1600" height="900" /> ओटीटी गाजवणारी मराठी अभिनेत्री, तिला कॅन्सरचं निदान झालं आहे. अभिनेत्रीने स्वत:च आपल्याला कॅन्सर झाल्याचं सांगितलं आहे. तिने हॉस्पिटलमधील आपला फोटोही पोस्ट केला आहे. पोस्टमध्ये तिने आपल्या आरोग्याबाबतची माहिती दिली आहे.
advertisement
2/7
2012 साली आमिर खानच्या तलाश फिल्ममध्ये एका छोटीशी भूमिका निभावत तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. त्यानंतर 2014 साली सलमानच्या किक फिल्ममध्येही ती दिसली.
advertisement
3/7
त्यानंतर ती 2016 मध्ये मुंबई सेंट्रल आणि 2017 मध्ये सेक्सी दुर्गा अशा फिल्ममध्ये दिसली. सेक्सी दुर्गा फिल्ममुळे ती ट्रोल झाली होती, तिला अॅसिड अटॅकची धमकी मिळाली.
advertisement
4/7
बॉलिवूडपेक्षा राजश्रीला ओटीटीमुळे जास्त ओळख मिळाली. तिने ओटीटी चांगलंच गाजवलं. नेटफ्लिक्स शो 'सेक्रेड गेम्स' मध्ये तिने नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्‍नी सुभद्राची भूमिका केली होती. तसंच द फेम गेम सीरिजमधून तिने माधुरी दीक्षितसोबतही काम केलं आहे. 2023 ची वेब सीरिज ट्रायल बाई फायर ही तिच्या करिअरमधील सगळ्यात महत्त्वाची ठरली. यासाठी तिने बेस्टफेअर कॅटेगिरी फिल्म ओटीटी पुरस्कार मिळाला.
advertisement
5/7
या अभिनेत्रीन फेसबुकवर पोस्ट केली आहे. ज्यात तिने तिला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं सांगितलं. ती म्हणाली, मला इन्फ्लॅट्रेटिंग डक्टल कार्सिनोमा (NOS) ग्रेड 1 ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं निदान झालं आहे. सुदैवाने आम्हाला रुटिन चेकअपमध्ये लवकर कळलं ज्यामुळे आम्हाला लढण्याची संधी मिळाली.
advertisement
6/7
असंख्य चाचण्या आणि शस्त्रक्रिया एका रोलर कोस्टर राईडसारखं वाटलं. पण सर्वांचं प्रेम मला त्यातून बाहेर काढत होतं. शस्त्रक्रियेनंतर माझ्या आईबाबांचे चेहरे पाहून माझी भीती अतूट शक्तीमध्ये बदलली. सर्वांच्या पाठिंब्याने मी जगाला तोंड देण्यास तयार आहे, असं ती म्हणाली.
advertisement
7/7
तुमचं प्रेम हेच माझं खरं औषध आहे आता मी बरी होत आहे आणि लवकरच हॉस्पिटलमधून घरी जाईन, असं म्हणत तिने डॉक्टरांचेही आभार मानले आहेत. ही अभिनेत्री आहे राजश्री देशपांडे. जिने तिच्या फेसबुकवर हा हॉस्पिटलमधील फोटोही पोस्ट केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT गाजवणाऱ्या मराठी अभिनेत्रीला कॅन्सर! हॉस्पिटलमधील PHOTO; म्हणाली, 'सर्जरीनंतर माझ्या...'