Sanskruti Balgude : संस्कृती बालगुडेचा सख्खा भाऊ MPSC परीक्षेत अव्वल, वडिलांनी अभिमानाने थोपटली पाठ
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Sanskruti Balgude Brother Crack MPSC : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री संस्कृती बालगुडे सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. संस्कृतीचा भाऊ MPSC परीक्षेत अव्वल ठरला आहे.
advertisement
1/7

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला असून मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा लहान भाऊ MPSC परीक्षेत राज्यात अव्वल ठरला आहे.
advertisement
2/7
संस्कृतीने बालगुडेने भावासोबतचे फोटो ,व्हिडीओ आणि एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
advertisement
3/7
संस्कृती बालगुडेने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"हा माझा लहान भाऊ! MPSC परिक्षेत महाराष्ट्रात 42 रँकने उत्तीर्ण झाला आहे. माझ्या भावाचा आणि त्याच्या हुशारिचा मला खूप अभिमान आहे".
advertisement
4/7
संस्कृती बालगुडेच्या पोस्टवर अनेक मराठी सेलिब्रिटींसह चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
advertisement
5/7
लेकाचं यश पाहून संस्कृतीसह तिच्या आई-वडिलांचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
advertisement
6/7
संस्कृती बालगुडेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकालदेखील चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यात तिच्या लहान भावाला राज्यात 42 रँक मिळालेला पाहायला मिळत आहे.
advertisement
7/7
MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन सरकारी अधिकारी होण्याचं संस्कृती बालगुडेच्या भावाचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sanskruti Balgude : संस्कृती बालगुडेचा सख्खा भाऊ MPSC परीक्षेत अव्वल, वडिलांनी अभिमानाने थोपटली पाठ