राहुल देशपांडे ते योगिता चव्हाण! मराठी इंडस्ट्रीतील या 10 सेलिब्रिटींच्या आयुष्यात वादळ
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Marathi Actors Divorce : राहुल देशपांडे ते योगिता चव्हाण गेल्या काही महिन्यांत मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांच्या आयुष्यात दुरावा आला आहे.
advertisement
1/10

राहुल देशपांडे (Rahul Deshpande) : शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आपल्या घटस्फोटाची बातमी दिली. 17 वर्षांचा संसारानंतर राहुल देशपांडे आणि नेहा कायदेशिररित्या विभक्त झाले.
advertisement
2/10
शुभांगी सदावर्ते (Shubhangi Sadavarte) : 'देवबाभळी' या नाटकाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचलेली अभिनेत्री शुभांगी सदावर्तेचा संगीतकार आनंद ओक यांच्यासोबत घटस्फोट झाला आहे. शुभांगी आणइ आनंद 2020 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. लग्नाच्या पाच वर्षांतच त्यांनी घटस्फोटाची घोषणा केली.
advertisement
3/10
सुयष टिळक (Suyash Tilak) : सुयश टिळक आणि आयुषी भावे 2011 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. पण आता इंस्टाग्रामवर दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं असून त्यांच्या नात्याला दुरावा आल्याची चर्चा आहे.
advertisement
4/10
अक्षया गुरव (Akshaya Gurav) : मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अक्षया गुरव आणि सिनेमॅटोग्राफर भूषण वाणी यांनी 23 मे 2017 मध्ये लग्नगाठ बांधली होती. पण आता त्यांनी सोशल मीडियावरुन लग्नाचे तसेच एकमेकांसोबतचे फोटो डिलिट केल्याने त्यांचाही घटस्फोट झाला असल्याचं म्हटलं जात आहे.
advertisement
5/10
योगिता चव्हाण (Yogita Chavan) सौरभ चौघुले (Saorabh Choughule) : 'जीव माझा गुंतला' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या योगिता-सौरभच्या ऑनस्क्रीन जोडीने खऱ्या आयुष्यातही एकमेकांसोबत संसार थाटला. 3 मार्च 2024 मध्ये त्यांनी थाटामाटात लग्न केलं. पण आता अचानक त्यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं असून एकमेकांसोबतचे फोटोही डिलिट केले आहेत.
advertisement
6/10
सई ताम्हणकर (Sai Tamhankar) : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर लग्नाच्या दोन वर्षांतच पती अमेयपासून वेगळी झाली होती. विशेष म्हणजे घटस्फोटानंतर त्यांनी एकत्र पार्टी केली होती.
advertisement
7/10
रुपाली भोसले (Rupali Bhosle) : अभिनेत्री रुपाली भोसलेचाही घटस्फोट झाला आहे.
advertisement
8/10
स्नेहा वाघ (Sneha Wagh) : अभिनेत्री स्नेहा वाघ दोन वेळा लग्नबंधनात अडकली. पण दोन्ही लग्नादरम्यान तिला अपयश आलं. अविष्कार दार्वेसोबत तिचं पहिलं लग्न झालं होतं. अविष्कारसोबत घरगुती हिंसाचारामुळे तिने घटस्फोट घेतला. त्यानंतर तिने अनुराग सोळंकीसोबत दुसरं लग्न केलं. पण लग्नाच्या आठ महिन्यांतच ती अनुरागपासून विभक्त झाली.
advertisement
9/10
मानसी नाईक (Manasi Naik) : अभिनेत्री मानसी नाईक प्रदीप खरेरासोबत 19 जानेवारी 2021 रोजी लग्नबंधनात अडकली. प्रदीपने मानसीसोबत पैशांसाठी लग्न केल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाले आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
advertisement
10/10
तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) : 'होणार सून मी या घरची' या मालिकेदरम्यान तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांनी लग्न केलं. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही आणि ते वेगळे झाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
राहुल देशपांडे ते योगिता चव्हाण! मराठी इंडस्ट्रीतील या 10 सेलिब्रिटींच्या आयुष्यात वादळ