Miss India Pageant : निळे डोळे, गोरा रंग, तरीही सुश्मिता सेनसमोर कशी हरली ऐश्वर्या राय? समोर आलं धक्कादायक कारण
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Sushmita Sen-Aishwarya Rivalry in Miss India : ‘मिस इंडिया’च्या स्पर्धेत सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या रायमध्ये मोठी चुरस होती. मात्र, सुष्मिताने ही बाजी मारली. ऐश्वर्याचा पराभव कसा झाला याबाबत धक्कादायक कारण समोर आलं आहे.
advertisement
1/8

मुंबई: १९९४ हे वर्ष भारतासाठी खूप खास होतं. याच वर्षी सुष्मिता सेनने ‘मिस युनिव्हर्स’चा आणि ऐश्वर्या रायने ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकला होता. पण, त्यापूर्वी ‘मिस इंडिया’च्या स्पर्धेत या दोघींमध्ये मोठी चुरस होती, अशी चर्चा होती.
advertisement
2/8
ऐश्वर्या राय त्याआधीच एक मोठी स्टार होती आणि तिने लॅक्मे आणि पेप्सीसारख्या मोठ्या ब्रँडसाठी जाहिराती केल्या होत्या, त्यामुळे सुष्मिता सेनला वाटत होतं की, ‘मिस इंडिया’चे आयोजक ऐश्वर्याला पाठिंबा देत आहेत.
advertisement
3/8
पण, या स्पर्धेत सुष्मिताने ऐश्वर्याला हरवून ‘मिस इंडिया’चा किताब जिंकला. आता याच विजयाबद्दल फिल्ममेकर प्रल्हाद कक्कड यांनी एक खूप मोठा खुलासा केला आहे.
advertisement
4/8
‘विकी लालवानी’ला दिलेल्या मुलाखतीत प्रल्हाद कक्कड म्हणाले, “या दोघींमध्ये कोणतीही स्पर्धा नव्हती. फक्त एवढंच होतं की, ऐश्वर्याने नुकतंच करिअर सुरू केलं होतं, ती अगदीच नवखी होती. तर, सुष्मिता कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेली असल्यामुळे चांगली तयार झालेली होती.”
advertisement
5/8
ते म्हणाले, “जेव्हा इंग्रजी भाषेत बोलायची वेळ येते, तेव्हा ज्यांची इंग्रजी कमकुवत असते, त्यांना खूप नुकसान होतं. यामुळेच प्रश्न-उत्तराच्या राऊंडमध्ये सुष्मिताने बाजी मारली आणि ती जिंकली.”
advertisement
6/8
कक्कड यांनी त्या दिवसाचा एक किस्साही सांगितला. ते म्हणाले, “मला आठवतंय, मी जेव्हा मेकअप रूममध्ये गेलो, तेव्हा सुष्मिता एका कोपऱ्यात बसून रडत होती.” मी तिला विचारलं, ‘काय झालं?’ तेव्हा ती म्हणाली, “‘हे सगळं फिक्स आहे, मी कधीच जिंकणार नाही.”
advertisement
7/8
मी तिला समजावलं, “तू मूर्ख आहेस का? ज्युरीकडे बघ, तुला वाटतं की कोणीतरी त्यांना विकत घेऊ शकेल? जे लोक बोलतात, त्याकडे लक्ष देऊ नकोस. जर तू या किताबासाठी लायक आहेस, तर तुला तो नक्कीच मिळेल, कारण ज्युरी खूप ताकदवान आहे.”
advertisement
8/8
प्रल्हाद सुष्मितासोबतची आठवण सांगत म्हणाले सुष्मिताने ‘मिस इंडिया’चा किताब जिंकल्यावर लगेच त्यांना फोन करून त्यांचे आभार मानले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Miss India Pageant : निळे डोळे, गोरा रंग, तरीही सुश्मिता सेनसमोर कशी हरली ऐश्वर्या राय? समोर आलं धक्कादायक कारण