TRENDING:

Do You Know : भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक Toll Naka? टोल का आणि कशासाठी भरावा लागतो?

Last Updated:
आजच्या घडीला भारतात हजाराहून अधिक टोल प्लाझा आहेत. मात्र, तुम्हाला माहिती आहे का की देशातील सर्वाधिक टोल प्लाझा कोणत्या राज्यात आहेत?
advertisement
1/8
भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक Toll Naka? टोल का आणि कशासाठी भरावा लागतो?
आज जवळजवळ प्रत्येकाकडे दोन किंवा चारचाकी गाडी आहे. शहरात फिरायला, कामासाठी किंवा लांब प्रवासाला जाताना आपल्याला ठिकठिकाणी टोल नाका लागतचो. अनेकांना प्रश्न पडतो की हा टोल शुल्क नेमका कशासाठी घेतला जातो?
advertisement
2/8
याचं सरळ उत्तर म्हणजे रस्त्यांच्या बांधकाम, देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च भागवण्यासाठी. टोलमधून जमा होणारा पैसा राष्ट्रीय महामार्ग, फ्लायओव्हर, सर्विस लेन आणि नवीन रस्त्यांच्या उभारणीसाठी वापरला जातो. रस्त्यांचा दर्जा चांगला असल्यास प्रवासही जलद आणि सोयीस्कर होतो. त्यामुळे टोल शुल्क भरलं जातं.
advertisement
3/8
आजच्या घडीला भारतात हजाराहून अधिक टोल प्लाझा आहेत. मात्र, तुम्हाला माहिती आहे का की देशातील सर्वाधिक टोल प्लाझा कोणत्या राज्यात आहेत?
advertisement
4/8
राजस्थान हे सर्वाधिक टोल प्लाझांचा राज्य आहे. येथे तब्बल 156 टोल प्लाझा आहेत. राजस्थानाचं क्षेत्रफळ मोठं आहे आणि रस्त्यांचं जाळंही विस्तृत आहे. वाळवंटी भाग मोठ्या प्रमाणात असल्याने येथील लोकांना चांगल्या वाहतूक सुविधांसाठी लांब आणि मजबूत महामार्गांची गरज आहे. त्याशिवाय, राजस्थान हे गुजरात आणि मध्य प्रदेशला जोडणाऱ्या महत्त्वाच्या कॉरिडॉरचं केंद्र आहे. त्यामुळे येथे टोल प्लाझांची संख्या जास्त असणं स्वाभाविक आहे.
advertisement
5/8
महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्गदिल्ली-जयपूर (एनएच 48) सारखे प्रमुख महामार्ग आणि गुजरात, मध्य प्रदेशकडे जाणारे आंतरराज्यीय रस्ते राजस्थानमधून जातात. त्यामुळे राजस्थान राष्ट्रीय वाहतुकीचं एक महत्त्वाचं केंद्र मानलं जातं. येथे टोल संग्रह केल्याने वाहतूक व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा दोन्हींचा दर्जा टिकवून ठेवता येतो.
advertisement
6/8
टोल शुल्क आणि सोयीसुविधाराज्यातील भौगोलिक गरजा आणि उद्योगांची संख्या यावर टोल प्लाझांची संख्या अवलंबून असते. टोल शुल्कातून मिळालेल्या रकमेचा उपयोग फ्लायओव्हर, सर्विस लेन, देखभाल आणि विस्तारकामांमध्ये केला जातो. टोल रस्त्यांमुळे प्रवास जलद आणि सोपा होतो.
advertisement
7/8
टोल रकमेचा उपयोग रस्त्यांच्या देखभालीपुरता मर्यादित नसतो, तर ग्रामीण रस्त्यांच्या विस्तारासाठीही केला जातो. यामुळे लहान शहरं आणि खेडी थेट महामार्गाशी जोडली जातात.
advertisement
8/8
आजकाल फास्टॅग आणि जीपीएस आधारित टोल वसुली प्रणाली आल्याने वेळेची मोठी बचत होते. वारंवार प्रवास करणाऱ्यांना वार्षिक पास मिळतो ज्यामुळे वर्षभरात 200 प्रवास सोप्या पद्धतीने करता येतात. थोडक्यात काय, तर गाड्यांचा वापर जितका वाढतोय तितकी टोल नाक्यांची गरज वाढत आहे. प्रवाशांना चांगले रस्ते आणि सोयीस्कर प्रवास मिळावा यासाठी टोल नाक्यांवरून वसूल होणारा पैसा महत्त्वाची भूमिका बजावतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Do You Know : भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक Toll Naka? टोल का आणि कशासाठी भरावा लागतो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल