ब्रेकअपच्या उंबरठ्यावर होतं विराट-अनुष्काचं नातं, भाईजानच्या एका सल्ल्याने सगळं जुळून आलं, नेमकं काय घडलेलं?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Virat Kohli-Anushka Sharma : क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं एका वेळी ब्रेकअपही झाले होते. पण ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकत्र येण्यामागे सलमान खानचा एक सल्ला कारणीभूत ठरला होता.
advertisement
1/7

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची टॉप अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जोडी आज भलेही कपल गोल्स म्हणून ओळखली जात असेल, पण त्यांच्या प्रेमसंबंधातही मोठे चढ-उतार आले होते. इतकेच काय, तर एका वेळी त्यांचे ब्रेकअपही झाले होते. पण तुम्हाला माहीत आहे का, ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकत्र येण्यामागे सलमान खानचा एक सल्ला कारणीभूत ठरला होता.
advertisement
2/7
विराट आणि अनुष्काची भेट एका जाहिरात शूटदरम्यान झाली आणि तिथूनच त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. सुरुवातीला त्यांचे नाते गोड असले तरी, विराटच्या क्रिकेट कारकिर्दीचा परिणाम त्यांच्या नात्यावर दिसू लागला.
advertisement
3/7
जेव्हा विराट कोहली मैदानावर चांगली कामगिरी करू शकला नाही, तेव्हा चाहत्यांनी आणि माध्यमांनी त्याचे खापर थेट अनुष्का शर्मावर फोडले. याच सततच्या टीकेमुळे आणि दबावामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि अखेरीस दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
4/7
या ब्रेकअपची चर्चा सिनेसृष्टीत आणि क्रिकेट वर्तुळात जोरदार सुरू होती. नेमक्या याच काळात अनुष्का शर्मा, सलमान खानसोबत सुलतान या चित्रपटाचे शूटिंग करत होती. अनुष्काच्या उदास चेहऱ्यामागील कारण सलमान खानला समजले. दोघांच्या प्रेमात आलेला तणाव पाहिल्यानंतर सलमानने थेट अनुष्काला मोलाचा सल्ला दिला.
advertisement
5/7
सलमान खानने अनुष्काला सांगितले की, "जर तुमचे प्रेम खरे असेल, तर ते टिकवून ठेवा. कारण खरं प्रेम पुन्हा पुन्हा मिळत नाही." सलमान खानचा हा सल्ला अनुष्काला पटला आणि तिने लगेचच विराट कोहलीशी पुन्हा एकदा संवाद साधला.
advertisement
6/7
सलमानच्या एका सल्ल्यानंतर अनुष्का आणि विराट पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी जास्त वेळ वाया न घालवता २०१७ मध्ये इटलीत धूमधडाक्यात लग्न केले. आता हे कपल आपली मुलगी वामिका आणि मुलगा अकाय सोबत लंडनमध्ये सुखी संसार करत आहे.
advertisement
7/7
लग्नानंतर अनुष्काने सिनेइंडस्ट्रीपासून काही काळ दूर राहून कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. तिचा आगामी 'चकदा एक्सप्रेस' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल, अशी तिच्या चाहत्यांना आशा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ब्रेकअपच्या उंबरठ्यावर होतं विराट-अनुष्काचं नातं, भाईजानच्या एका सल्ल्याने सगळं जुळून आलं, नेमकं काय घडलेलं?