OTT वरुन हटवली जाणार ही खतरनाक हॉरर फिल्म, 31 डिसेंबरआधी घ्या पाहून
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Most Scariest Horror Film on OTT : ओटीटीवरील एक सुपरहिट हॉरर फिल्म तुम्ही पाहिली नसेल तर लवकर पाहून टाका. कारण 31 डिसेंबरनंतर तुम्हाला हा चित्रपट पाहता येणार नाही.
advertisement
1/7

गेल्या काही वर्षांत घरबसल्या ओटीटीवर सिनेमे आणि वेब सीरिज पाहायला प्रेक्षक पसंती दर्शवत आहेत. त्यामुळे घरबसल्या हॉरर कंटेंट पाहण्यावर प्रेक्षकांचा कल वाढतो आहे. ओटीटीवरील एक खतरनाक सुपरहिट हॉरर फिल्म लवकरच निरोप घेणार आहे. त्यामुळे 31 डिसेंबर आधी ही फिल्म पाहून घ्या.
advertisement
2/7
ओटीटीवर प्रत्येक आठवड्याला अनेक नवे चित्रपट आणि सीरिज रिलीज होत आहेत. या नव्या कथानक असलेल्या फिल्म आणि सीरिज प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहेत. या नव्या बदलाचा हॉरर जॉनरदेखील साक्ष आहे.
advertisement
3/7
ओटीटीवरील एक हॉरर फिल्म 20 वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलच घाबरवलं. सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. ओटीटीवरुन लवकरच हा चित्रपट हटवण्यात येणार आहे.
advertisement
4/7
ओटीटीवरील या हॉरर फिल्मचं नाव 'द एक्सॉर्सिज्म ऑफ एमिली रोज' (The Exorcism of Emily Rose) असं आहे. 1996 मधील एका सत्य घटनेवर प्रेरित हा चित्रपट 9 सप्टेंबर 2005 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. स्कॉट डेरिकसन यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. अतिशय गंभीर असा या चित्रपटाचा विषय होता.
advertisement
5/7
'द एक्सॉर्सिज्म ऑफ एमिली रोज' या चित्रपटात अनेक दमदार कलाकार झळकले होते. या चित्रपटात जेनिफर कारपेंटरने एमिली रोज ही भूमिका साकारली होती. टॉम विल्किंसन, लॉरा लिनी हे कलाकारदेखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत होते. हॉररसह कोर्ट रूम ड्रामाही या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळाला.
advertisement
6/7
'द एक्सॉर्सिज्म ऑफ एमिली रोज' या चित्रपटाची कथा एमिली नामक एका मुलीच्या अवतीभोवती फिरते. एमिलीचं एक्सोरसिज्म केलं जातं. त्यानंतर तिचं निधन होतं.
advertisement
7/7
एमिलीचं प्रकरण पुढे कोर्टात जातं. हे प्रकरण खरंच भूता-प्रेताशी जोडलेलं आहे का? हे न्यायालयाला जाणून घ्यायचं असतं. 150-160 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. जगभरात या चित्रपटाने 1,150 कोटी रुपयांची कमाई केली. IMDB वर या चित्रपटाला 6.7 रेटिंग मिळाले आहे. नेटफ्लिक्सवर सध्या हा चित्रपट उपलब्ध आहे. पण 31 डिसेंबरनंतर हा चित्रपट ओटीटीवरुन हटवण्यात येणार आहे.