सचिन पिळगांवकरांच्या या गाण्याचा गिरीजा ओकला ट्रॉमा, नॅशनल क्रश म्हणाली,"धडधडायला लागतं कारण..."
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Girija Oak : प्रत्येक व्यक्तीप्रमाणे नॅशनल क्रश गिरीजा ओकलादेखील एका गोष्टीचा ट्रॉमा आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत तिने याबाबत भाष्य केलं आहे.
advertisement
1/7

गिरीजा ओक मराठी-हिंदी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आजवर अनेक चित्रपट, मालिका, जाहिरातींमध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तिच्यातला साधेपणा प्रेक्षकांना विशेष भावतो. काही दिवसांपूर्वी गिरीजाची निळ्या साडीतील एक मुलाखत व्हायरल झाली आणि ती रातोरात 'नॅशनल क्रश' झाली.
advertisement
2/7
एखादी तणावपूर्ण, धक्कादायक घटना अनुभवल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर होणारा दीर्घकाळ टिकणारा नकारात्मक परिणाम म्हणजे ट्रॉमा. प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा ट्रॉमा असतो. रातोरात नॅशनल क्रश झालेल्या गिरीजा ओकलादेखील एका गोष्टीचा ट्रॉमा आहे.
advertisement
3/7
इसापनितीला दिलेल्या मुलाखतीत गिरीजा ओकने आपल्या ट्रॉमाबाबत भाष्य केलं आहे. तसेच तिच्या 'दोन स्पेशल' या नाटकाच्या एका प्रयोगादरम्यानचा ट्रॉमा बाबतचा एक किस्साही तिने शेअर केला आहे.
advertisement
4/7
गिरीजा ओक म्हणाली,"नाटक सुरू असताना लोक बोलतात, चिप्सच्या पाकीटाचा आवाज येतो, फोन वाजतात. 'दोन स्पेशल' नाटकात एका सीनदरम्यान मी एका अशा प्रसंगाबद्दल बोलते जिथे माझ्या बहिणीवर अती प्रसंग झालेला असतो. त्यामुळे अख्खं आयुष्य बदलतं. कारण अती प्रसंगानंतर बहिणीने आत्महत्या केलेली असते".
advertisement
5/7
गिरीजा म्हणते,"त्यानंतर माझे संवाद होते की, धनुने असं करुन घेतलं. मग असं झालं तसं झालं वगैरे. त्यानंतर मी एक पॉझ घेते. कारण मला खूप रडू येत असतं. एका प्रयोगादरम्यान माझ्यासमोर दुसऱ्या रांगेत एका माणसाचा फोन वाजला आणि त्याची रिंगटोन होती 'हृदयी वसंत फुलताना'".
advertisement
6/7
गिरीजा पुढे म्हणाली,"त्यावेळी मी माझ्या भावना खूप कंट्रोल केल्या होत्या. अश्रू दिसता कामा नये, आपण वीक दिसायला नको याकडे माझं लक्ष होतं. त्यावेळी याक्षणी मी स्वत:चं काय करू असं मला झालं होतं. तेव्हापासून त्या गाण्याचा मला ट्रॉमा झालाय. हे गाणं दुसरीकडे कुठे ऐकू आलं तरी मला धडधडायला लागतं. हे गाणं नाही ऐकायचं असं मला होतं".
advertisement
7/7
नॅशनल क्रश गिरीजा ओकला ट्रॉमा असणारं 'हृदयी वसंत फुलताना' हे गाणं 1988 मध्ये आलेल्या 'अशी ही बनवाबनवी' या सुपरहिट मराठी चित्रपटातील आहे. शांताराम नांदगावकर यांनी हे सहाबहार रोमँटिक गाणं लिहिलं असून सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, सुदेश भोसले, शैलेंद्र सिंह, सचिन पिळगांवकर आणि अपर्णा मयेकर यांनी हे गाणं गायलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सचिन पिळगांवकरांच्या या गाण्याचा गिरीजा ओकला ट्रॉमा, नॅशनल क्रश म्हणाली,"धडधडायला लागतं कारण..."