TRENDING:

Mahalaxmi Rajyog: अमावस्येच्या रात्री 10:50 वाजता नशिबाचे तारे फिरणार; या राशींना डबल राजयोगात लाभ

Last Updated:
Amavashya Astrology: वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या चालीला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. सध्याच्या ग्रहस्थितीनुसार मंगळ धनु राशीत विराजमान आहे आणि आज 19 डिसेंबर रोजी रात्री 10:50 वाजता चंद्रसुद्धा धनु राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत आधीपासूनच सूर्य आणि शुक्र उपस्थित आहेत. चंद्राच्या प्रवेशामुळं धनु राशीत चार ग्रहांची युती होईल, ज्यामुळं महालक्ष्मी राजयोग, लक्ष्मी-नारायण योग आणि अमावस्या योग तयार होत आहेत.
advertisement
1/5
अमावस्येच्या रात्री 10:50 वाजता नशिबाचे तारे फिरणार; या राशींना डबल राजयोगात लाभ
ज्योतिषशास्त्रानुसार हा संयोग पैसा, प्रतिष्ठा, सुख-सुविधा आणि मानसिक स्थिरतेमध्ये वाढ होण्याचे संकेत देतोय. याचा परिणाम सर्व 12 राशींवर होईल, पण तीन राशींसाठी हा योग सर्वात जास्त शुभ मानला जात आहे.
advertisement
2/5
कन्या - कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक आणि कौटुंबिक दृष्टीने अत्यंत शुभ ठरणार आहे. महालक्ष्मी राजयोगाच्या प्रभावामुळे बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीची बातमी मिळू शकते.
advertisement
3/5
कन्या - व्यापाऱ्यांसाठी नवीन गुंतवणूक आणि नफ्याचे योग तयार होत आहेत. कौटुंबिक जीवनात सुख-शांती टिकून राहील. आईच्या प्रकृतीत सुधारणा पाहायला मिळू शकते. या काळात केलेलं कोणतंही शुभ काम भविष्यात फायदेशीर ठरेल.
advertisement
4/5
धनू - धनू राशीतच चार ग्रहांची युती होत असल्यामुळे या राशीच्या लोकांवर महालक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. आत्मविश्वासात वाढ होईल. करिअरशी संबंधित मोठ्या संधी मिळू शकतात. सरकारी नोकरी किंवा प्रशासनाशी संबंधित लोकांना विशेष यश मिळू शकतं. आर्थिक स्थिती भक्कम होईल आणि अचानक धनलाभाचे योग आहेत. विवाहयोग्य व्यक्तींसाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतात. ही वेळ नशिबाला साथ देणारी ठरेल.
advertisement
5/5
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांसाठी हा राजयोग प्रगती आणि मान-सन्मान घेऊन येईल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचं कौतुक होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. जे लोक नवीन व्यवसाय सुरू करू इच्छितात, त्यांच्यासाठी ही वेळ अनुकूल आहे. सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट भविष्यात लाभ मिळवून देऊ शकते. आर्थिकदृष्ट्या ही वेळ स्थिरता आणि समृद्धी देणारी असेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Mahalaxmi Rajyog: अमावस्येच्या रात्री 10:50 वाजता नशिबाचे तारे फिरणार; या राशींना डबल राजयोगात लाभ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल