TRENDING:

Pune News: पुण्यात 'या' शाळेत विद्यार्थ्यांना चक्क भाकरी बनवायला शिकवतात, नेमकं कारण काय? ही शाळा नक्की कुठंय?

Last Updated:

पुण्यातील एका शाळेने आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा उपक्रम राबवला असून, या शाळेतील विद्यार्थी स्वतः घरी भाकरी बनवून आपल्या आई- वडिलांना प्रेमाने खाऊ घालत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: आधुनिक काळात शिक्षण म्हणजे केवळ डिजिटल तंत्रज्ञान, कॉम्प्युटर आणि स्मार्ट बोर्डपुरते मर्यादित राहिले नसून विद्यार्थ्यांना आपल्या मातीशी, परंपरा आणि संस्कृतीशी जोडणेही तितकेच आवश्यक आहे. हीच संकल्पना प्रत्यक्षात उतरवत पुण्यातील आयडिल पब्लिक स्कूलने एक अनोखा उपक्रम राबवला असून, या शाळेतील विद्यार्थी स्वतः घरी भाकरी बनवून आपल्या आई- वडिलांना प्रेमाने खाऊ घालत आहेत.
advertisement

आयडिल पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या वयोगटानुसार नव्हे तर त्यांच्या क्षमतेनुसार शिक्षण दिले जाते. सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांच्या कला- गुणांना वाव मिळावा, यासाठी शाळा कायम विशेष प्रयत्न करत असते. शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेली किंवा विशेष गरज असलेले मुले असली तरी त्यांच्यासाठीही स्वतंत्र पद्धतीने शिक्षण आणि उपक्रम राबवले जात आहेत. शाळेत विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जीवनमूल्यांचे शिक्षण दिले जात आहे. त्यातीलच कष्टाची भाकरी हा उपक्रम विशेष लक्ष वेधून घेत आहे.

advertisement

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांचे कष्ट, शेतातून घरापर्यंत येणाऱ्या धान्याचा प्रवास, विविध इंधनांचा वापर, तसेच विविध धातूंमधून तयार होणाऱ्या भांड्यांची माहिती दिली जाते. प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्यावर भर देत मुलांना भाकरी कशी तयार होते, त्यामागील मेहनत काय असते, याची जाणीव करून दिली जाते. आजची पिढी पिझ्झा, बर्गर यांसारख्या फास्ट फूडच्या आहारी जात असताना, भाकरीसारख्या पारंपरिक अन्नाचे महत्त्व पटवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः भाकरी बनवून ती आपल्या आई- वडिलांना खाऊ घालण्याचा संकल्प केला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान केंद्र कोणतं? आता एका क्लिकवर मिळवा माहिती
सर्व पहा

गेल्या पंधरा दिवसांपासून पालकही मुलांना रोज भाकरी करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. अनेक विद्यार्थी दररोज शेवटची भाकरी स्वतः करून ती आपल्या पालकांना प्रेमाने खाऊ घालत असल्याचे चित्र दिसत आहे. या उपक्रमाबाबत माहिती देताना आयडिल पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योती गायकवाड म्हणाल्या, "डिजिटल शिक्षणासोबतच मुलांमध्ये संस्कार, कष्टाची जाणीव आणि कुटुंबातील नातेसंबंध मजबूत होणे गरजेचे आहे. कष्टाची भाकरी या उपक्रमातून मुले केवळ स्वयंपाक शिकत नाहीत, तर मेहनत, आदर आणि संस्कृतीचे मोलही शिकत आहेत. हा उपक्रम सध्या पुणे शहरात कौतुकाचा विषय ठरत असून, इतर शाळांसाठीही तो प्रेरणादायी ठरत आहे."

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुण्यात 'या' शाळेत विद्यार्थ्यांना चक्क भाकरी बनवायला शिकवतात, नेमकं कारण काय? ही शाळा नक्की कुठंय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल