तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. हे तुम्ही घरबसल्या पाहू शकता. यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून मताधिकार अॅप डाऊनलोड करा. अॅप उघडल्यानंतर Voter List Search या पर्यायावर क्लिक करा आणि तुमचं पूर्ण नाव किंवा ओळखपत्र क्रमांक (EPIC) टाका. नावाने शोधत असाल तर जिल्हा आणि महानगरपालिका निवडा. ओळखपत्र क्रमांक दिल्यास लगेच माहिती मिळते. या अॅपवर तुम्ही तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही पाहू शकता, तसेच तुमचं मतदान केंद्र कुठे आहे आणि प्रभागातील उमेदवार कोण आहेत, यांची माहिती मिळणार आहे.
advertisement
आयटीमधील नोकरी सोडली, वाचनसंस्कृतीसाठी पुण्यातील दाम्पत्याचा अनोखा उपक्रम, Video पाहून कराल कौतुक
ज्यांना मताधिकार अॅप वापरता येत नाही, ते https://mahasecvoterlist.in/ या वेबसाइटवर जाऊन मतदार यादीत नाव शोधू शकतात. वेबसाइट उघडल्यानंतर Search Name In VoterList या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Name Wise आणि EPIC Number Wise असे दोन पर्याय दिसतील. Name Wise निवडल्यास जिल्हा आणि महानगरपालिका निवडून तुमचं पूर्ण नाव टाका, यादीत नाव आहे की नाही ते कळेल. EPIC Number Wise निवडल्यास जिल्हा आणि महानगरपालिका निवडून मतदार ओळखपत्राचा क्रमांक टाकल्यावर थेट माहिती मिळते.
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी 3 कोटी 48 लाख 78 हजार मतदार आहेत. या सर्व मतदारांसाठी 39 हजार 147 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.





