मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान केंद्र कोणतं? आता एका क्लिकवर मिळवा माहिती Video

Last Updated:

तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही? हे पाहण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. हे तुम्ही घरबसल्या पाहू शकता.

+
मतदार

मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान केंद्र कोणतं? माहिती मिळवा एका क्लिकवर

पुणे: राज्यात अखेर महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकांसाठी राज्यभरातून 3 कोटी 48 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यंदा निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आयोगाने मताधिकार हे विशेष मोबाईल अ‍ॅप लाँच केले असून, या अ‍ॅपच्या माध्यमातून मतदारांना घरबसल्या निवडणुकीसंबंधी आवश्यक माहिती मिळणार आहे.
तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. हे तुम्ही घरबसल्या पाहू शकता. यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून मताधिकार अ‍ॅप डाऊनलोड करा. अ‍ॅप उघडल्यानंतर Voter List Search या पर्यायावर क्लिक करा आणि तुमचं पूर्ण नाव किंवा ओळखपत्र क्रमांक (EPIC) टाका. नावाने शोधत असाल तर जिल्हा आणि महानगरपालिका निवडा. ओळखपत्र क्रमांक दिल्यास लगेच माहिती मिळते. या अ‍ॅपवर तुम्ही तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही पाहू शकता, तसेच तुमचं मतदान केंद्र कुठे आहे आणि प्रभागातील उमेदवार कोण आहेत, यांची माहिती मिळणार आहे.
advertisement
ज्यांना मताधिकार अ‍ॅप वापरता येत नाही, ते https://mahasecvoterlist.in/ या वेबसाइटवर जाऊन मतदार यादीत नाव शोधू शकतात. वेबसाइट उघडल्यानंतर Search Name In VoterList या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Name Wise आणि EPIC Number Wise असे दोन पर्याय दिसतील. Name Wise निवडल्यास जिल्हा आणि महानगरपालिका निवडून तुमचं पूर्ण नाव टाका, यादीत नाव आहे की नाही ते कळेल. EPIC Number Wise निवडल्यास जिल्हा आणि महानगरपालिका निवडून मतदार ओळखपत्राचा क्रमांक टाकल्यावर थेट माहिती मिळते.
advertisement
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी 3 कोटी 48 लाख 78 हजार मतदार आहेत. या सर्व मतदारांसाठी 39 हजार 147 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान केंद्र कोणतं? आता एका क्लिकवर मिळवा माहिती Video
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement