नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणकोणत्या जिल्ह्यासाठी नियम लागू?
- Reported by:Pooja Satyavan Patil
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका 20 डिसेंबरला होणार आहेत. या निवडणुकांमध्ये मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
पूजा सत्यवान पाटील प्रतिनिधी पुणे
पुणे: पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका 20 डिसेंबरला होणार आहेत. या निवडणुकांमध्ये मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 20 डिसेंबरला जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
मतदारांसाठी 20 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर
प्रशासनाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील बारामती, दौंड, फुरसुंगी-उरुळी देवाची, लोणावळा आणि तळेगाव दाभाडे या नगरपरिषदांच्या मतदारसंघात 20 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या सुट्टीमुळे मतदारांना मतदानाचा हक्क बजावणे सुलभ होणार आहे. तसेच संबंधित सर्व विभागांनी त्यांच्या नियंत्रणाखालील शासकीय व निमशासकीय कार्यालये, महामंडळे व मंडळांना याबाबत सूचना देण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
advertisement
मतदारसंघाच्या हद्दीत येणारे तसेच कामानिमित्त त्या-त्या मतदारसंघाबाहेर असलेले मतदार यांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे. केंद्र शासनाची शासकीय व निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींनाही 20 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी असेल. नगरपरिषद निवडणुकीत सर्व मतदारांनी न चुकता मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 6:08 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणकोणत्या जिल्ह्यासाठी नियम लागू?











