T20 World Cup 2026 साठी टीम इंडियाचा संघ दिग्गजाने निवडला, अभिषेक शर्मा शुभमन गिल ओपनिंग करणार, संजू सॅमसनच काय?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
येत्या 7 फेब्रुवारी 2026 पासून टी20 वर्ल्ड कपला सूरूवात होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी उद्या टीम इंडियाची घोषणा होणार आहे.या घोषणेआधीच टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी टी20 वर्ल्डकप 2026 साठी टीम निवडली आहे.
T20 World Cup 2026 : येत्या 7 फेब्रुवारी 2026 पासून टी20 वर्ल्ड कपला सूरूवात होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी उद्या टीम इंडियाची घोषणा होणार आहे.या घोषणेआधीच टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी टी20 वर्ल्डकप 2026 साठी टीम निवडली आहे. या टीममध्ये नेमक्या कोणकोणत्या खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. हे जाणून घेऊयात.
advertisement
टी20 वर्ल्ड कप 2026 साठी भारताचा संघ निवडताना भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा म्हणाला की, शुभमन गिल 2026 च्या टी20 वर्ल्डकपसाठी उपकर्णधारपदी कायम राहण्याची शक्यता आहे. जरी हार्दिक पंड्या हा पर्याय असल्याचे त्याने नमूद केले. आशिया कप 2025 च्या आधी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली गिलला उपकर्णधारपद देण्यात आले होते. परंतु फॉर्ममध्ये घसरण झाल्यामुळे त्याच्यावर प्रचंड टीका होत आहे. पण असे जरी असले करी भारताच्या संघाची निवड करताना, चोप्राने गिलचा समावेश केला. परंतु संघ व्यवस्थापन अद्याप उपकर्णधारपद अंतिम करू शकत नाही आणि हार्दिकचाही विचार करू शकते असे सांगितले.
advertisement
🇮🇳🏆 My Squad For India's #T20WorldCup2026 - would you change anything? #Aakashvani pic.twitter.com/UfG4En0pR3
— Aakash Chopra (@cricketaakash) December 19, 2025
अभिषेक शर्मा, शुभमन गिल आणि संजू सॅमसन हे या संघात तीन सलामीवीर असतील. मी संजू सॅमसनला दुसरा यष्टिरक्षक आणि सलामीवीर पर्याय म्हणून निवडले आहे. अभिषेक शर्माबद्दल, त्याबद्दल बोलू नका, कारण मला वाटते की तो विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असू शकतो, असे आकाश चौप्रा त्यांच्या युट्यूब चॅनलवर सांगतात.
advertisement
आकाश चोप्रा पुढे सांगतात, जर तुम्हाला प्रश्न पडत असेल की शुभमन गिलला का निवडले गेले, तर संघ उपकर्णधारपदाची जागा खुली ठेवू शकतो किंवा त्यांचे पर्याय खुले ठेवण्यासाठी ते हार्दिक पंड्याची नियुक्ती करू शकतात," असे तो पुढे म्हणाला.
आकाश चोप्रा यांनी जितेश शर्माला पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक म्हणून निवडले, तर संजू सॅमसनला दुसरा पर्याय म्हणून निवडले. वेगवान गोलंदाजीमध्ये, त्यांनी जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांना विशेषज्ञ जलद गोलंदाज म्हणून निवडले, तर हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांना सीम-बॉलिंग ऑल-राउंड पर्याय म्हणून निवडले. मला वाटते की वरुण चक्रवर्ती या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज असू शकतो," चोप्रा म्हणाले आहेत.
advertisement
तुम्हाला स्वतःला पर्याय देण्यासाठी कुलदीप यादवला संघात ठेवावे लागेल. त्यानंतर फक्त एकच जागा उरते. तुम्ही तिथे कोणताही वेगवान गोलंदाज निवडू शकता, म्हणून मी हर्षित राणाला ठेवत आहे. तो ८ व्या क्रमांकावर फलंदाजीचा पर्याय देखील देतो.
टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
advertisement
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, जितेश शर्मा,हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अर्शदिप सिंह, हर्षित राणा, कुलदीप यादव,वरुण चक्रवर्ती
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 5:56 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup 2026 साठी टीम इंडियाचा संघ दिग्गजाने निवडला, अभिषेक शर्मा शुभमन गिल ओपनिंग करणार, संजू सॅमसनच काय?










