Weight Loss Tips : रोजचा चहाच करेल तुमचं वजन कमी! चहात मिसळा 'हे' 3 पदार्थ, वेगाने होईल फॅट बर्निंग

Last Updated:
Ayurvedic fat burning tea : हिवाळा असो किंवा उन्हाळा चहा हा भारतीय जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. दिवसाची सुरुवात असो किंवा थंडीमध्ये शरीर गरम ठेवायचं असो चहाचा एक कप सगळं काही ठीक करतो. भारतात चहा हे फक्त पेय नाही, तर एक सवय आहे. मात्र हिवाळ्यात रोज चहा प्यायल्याने पोट फुगतं आणि वजन वाढतं असे अनेकांना वाटतं. त्यामुळे काही लोक चहा सोडण्याचाही विचार करतात. मात्र आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्याची सोपी आयडिया सांगत आहोत.
1/9
तज्ज्ञांच्या मते, चहा पूर्णपणे सोडण्याची गरज नाही. योग्य पद्धतीने आणि योग्य घटकांसह चहा घेतला तर तो नुकसान करण्यापेक्षा अधिक फायदेशीर ठरू शकतो. हिवाळ्यात चहा केवळ शरीर गरम ठेवत नाही, तर चयापचयालाही चालना देतो. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. खरा प्रश्न चहाचा नसून त्यात घातल्या जाणाऱ्या चुकीच्या घटकांचा आहे. जास्त साखर, जास्त दूध किंवा चुकीचे फ्लेवर चहाला अपायकारक बनवतात. योग्य घटकांसह तयार केलेल्या चहाचा हिवाळ्यातही वजन वाढण्याची चिंता न करता आनंद घेता येऊ शकतो.

advertisement
2/9
तज्ज्ञ सांगतात की वजन कमी करण्याचा उद्देश असेल तर चहा दुधाविना घ्यावा. दिवसाला दोन कप पुरेसे मानले जातात आणि जास्तीत जास्त तीन कपांपर्यंत मर्यादा ठेवणे योग्य ठरते. खूप जास्त चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर नसून तो कितीही आरोग्यदायी असला तरी नुकसानच करू शकतो.

3/9
लोक वजन कमी करण्यासाठी किंवा आरोग्य सुधारण्यासाठी चहात आल्याचे तुकडे, दालचिनी, काळी मिरी आणि ओव्यासारखे घटक घालतात. हिवाळ्यात हे घटक विशेष फायदेशीर मानले जातात, कारण त्यांचा गुणधर्म उष्ण असतो आणि ते शरीर आतून गरम ठेवण्यास मदत करतात.

4/9
हिवाळ्यात चहा शरीराला उष्णता देतो. त्यात आलं, दालचिनी किंवा काळी मिरीसारखे घटक घातल्यास थंडीपासून संरक्षण मिळतं, पचन सुधारतं आणि चयापचय सक्रिय राहतो. त्यामुळे हिवाळ्यात चहा सोडण्याची गरज नाही. फक्त एवढी काळजी घ्या की चहात जास्त साखर आणि दूध घालू नका, म्हणजे तो आरोग्यास अपायकारक ठरण्याऐवजी फायदेशीर बनेल. तसेच चहा मर्यादेतच प्या.

5/9
पुदिना :  पुदिना शरीराला थंडावा देतो आणि पचन सुधारतो. पुदिन्याचा सुगंध भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. आयुर्वेदानुसार, पुदिना शरीरातील वाढलेलं पित्त शांत करतो, उष्णता आणि अस्वस्थता कमी करतो. पुदिन्याची काळी चहा पिल्याने पोट फुगणे आणि क्रेव्हिंग कमी होते. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय ठरतो.

6/9
बडीशेप : उन्हाळ्यात पोट फुगणे आणि जडपणा जाणवणे ही सामान्य समस्या आहे. बडीशेप या समस्येतून आराम देते. आयुर्वेदात बडीशेपला पचन सुधारक मानले जाते. आधुनिक संशोधनानुसार, बडीशेप भूक संतुलित ठेवते आणि अति खाण्यापासून वाचवते. चहात बडीशेप घातल्याने पोटाला आराम मिळतो आणि पचन सुलभ होते. तिचा थंडावा देणारा गुणधर्म तिला उन्हाळ्यासाठी योग्य बनवतो.

7/9
हिरवी वेलची : वेलची अनेकदा चहात फक्त सुगंधासाठी घातली जाते, पण तिचे फायदे त्यापेक्षा खूप अधिक आहेत. हिरवी वेलची चयापचयाला चालना देते आणि शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर टाकण्यास मदत करते. आयुर्वेदानुसार वेलची सर्व प्रकृतींसाठी सुरक्षित मानली जाते. वेलची घातलेला काळा चहा गोड खाण्याची इच्छा जास्त असणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरतो.

8/9
उन्हाळ्यासाठी खास फॅट बर्निंग चहा : तज्ज्ञ सुचवतात की या तिन्ही घटकांचे फायदे एकत्र घ्यायचे असतील, तर पुदिना, बडीशेप आणि वेलची एकत्र करून चहा तयार करा. हा चहा गरम किंवा थंड करून आयस्ड टी स्वरूपातही घेता येतो. हे पेय उन्हाळ्यात शरीराला ताजेतवाने ठेवते आणि चयापचय सक्रिय ठेवण्यास मदत करते.

9/9
या गोष्टी लक्षात ठेवा : प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असतं. तुम्हाला अ‍ॅसिडिटी किंवा पचनाच्या तक्रारी असतील तर एकाच घटकापासून सुरुवात करा. मधुमेह असलेल्या रुग्णांनी मध किंवा गूळ टाळावा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारच्या चहात दूध आणि साखर घातल्यास त्याचे सगळे फायदे नष्ट होतात.

Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement