TRENDING:

लेकाच्या लग्नात हजेरी, सुनेचाही फेव्हरेट; आदेश बांदेकरांच्या फॅमिलीतील सगळ्यात लाडक्या मेम्बरचं निधन

Last Updated:
अभिनेते आदेश बांदेकर यांच्या कुटुंबातील अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. त्यांचा मुलगा सोहमने इमोशनल पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.
advertisement
1/8
आदेश बांदेकरांच्या फॅमिलीतील सगळ्यात लाडक्या मेम्बरचं निधन
मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध सूत्रसंचालक आणि अभिनेते आदेश बांदेकर यांच्या मुलाचं काही दिवसांआधीच लग्न झालं. सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी लग्नबंधनात अडकले.
advertisement
2/8
मुलाचं लग्न होऊन काही दिवस होत नाहीत तोच आदेश बांदेकर यांच्या अत्यंत जवळच्या फॅमिली मेम्बरचं निधन झालं आहे. सोहम बांदेकरनं सोशल मीडियावर पोस्ट लिहित ही माहिती दिली आहे. सोहमची पोस्ट वाचून चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे.
advertisement
3/8
आदेश बांदेकरांचा हा फॅमिली मेम्बर त्यांचा मुलगा सोहम आणि संपूर्ण बांदेकर फॅमिलीचा लाडका होता. गेली 17 वर्ष तो बांदेकर फॅमिलीचा भाग होता. बांदेकरांची नवी सून पूजा बिरारीचा देखील तो फेव्हरेट होता. पूजा आणि सोहमच्या लग्नातही त्याची उपस्थिती पाहायला मिळाली.
advertisement
4/8
आदेश बांदेकर यांच्या घरातील त्यांचा लाडका श्वान सिंबाचं निधन झालं आहे. सिंबा गेली 17 वर्ष त्यांचा फॅमिली मेम्बर होता. त्याच्या जाण्याने बांदेकर कुटुंबाला धक्का बसला आहे. सिंबा त्याच्या वयामुळे थकला होता. सोहमच्या लग्नातही तो दिसला होता. सोहमसोबत त्याचं खूप जवळचं नातं होतं.
advertisement
5/8
सिंबाच्या निधनानंतर सोहमनं त्याचे फोटो शेअर करत इमोनल पोस्ट लिहिली आहे. सोहमने पोस्टमध्ये लिहिलंय, "माझ्या आयुष्यातील 28 वर्षांपैकी जवळपास 17 वर्षे माझा पार्टनर, रूममेट, माझा आधार, माझा काऊन्सिलर, माझा सर्वात मोठा सपोर्टर आणि माझ्या आयुष्यातलं प्रेम… तो आता आमच्यासोबत नाही. त्याने आपली साथ सोडून देवांसोबत आपलं प्रेम आणि अस्तित्व शेअर करण्याचा निर्णय घेतला आहे."
advertisement
6/8
"आम्हाला दिलेल्या सर्व निःस्वार्थ आणि निखळ प्रेमाबद्दल धन्यवाद. तू नेहमीच आमच्यासोबत असशील. सिम्बाला तुम्ही सगळ्यांनी खूप प्रेम दिलं, त्याच्या प्रवासावर आणि अपडेट्सवर लक्ष ठेवलं."
advertisement
7/8
"त्याची प्रत्यक्ष भेट झाली नाही तरीही तुम्ही मनापासून त्याची काळजी घेतलीत. तुमचं प्रेम आणि आपुलकी तो नेहमीच जाणवत होती. यासाठी आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो."
advertisement
8/8
सोहमची बायको अभिनेत्री पूजा बांदेकर हिचं देखील सिंबावर खूप प्रेम होतं. लग्नाच्या मेहेंदीमध्ये पूजानं एका हातावर सिंबाचं चित्र काढलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
लेकाच्या लग्नात हजेरी, सुनेचाही फेव्हरेट; आदेश बांदेकरांच्या फॅमिलीतील सगळ्यात लाडक्या मेम्बरचं निधन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल