न्यूझीलंडविरुद्धची टी-20 सीरिज आणि त्यानंतर होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा शनिवारी दुपारी दीड वाजता होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकूण 8 मॅच होणार आहेत, ज्यात पहिले 3 वनडे आणि मग 5 टी-20 मॅच खेळवल्या जातील. वनडे सीरिजचे सामने 11 जानेवारी, 14 जानेवारी आणि 18 जानेवारीला अनुक्रमे बडोदा, राजकोट आणि इंदूरमध्ये होतील.
advertisement
वनडे सीरिजनंतर 21 ते 31 जानेवारीदरम्यान 5 टी-20 सीरिज खेळवली जाईल. पहिली टी-20 मॅच नागपूरमध्ये, दुसरी मॅच 23 जानेवारीला रायपूरमध्ये, तिसरा सामना 25 जानेवारीला गुवाहाटीमध्ये होईल. तर चौथी मॅच विशाखापट्टणमला 28 जानेवारीला आणि शेवटची मॅच 31 जानेवारीला तिरुवनंतपुरमला होईल.
गिलचा फॉर्म चिंतेचा विषय
न्यूझीलंडविरुद्धची सीरिज आणि टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम निवडीला 24 तास शिल्लक असतानाच शुभमन गिलचा फॉर्म आणि फिटनेस टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. मागच्या 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गिलला अर्धशतक करता आलेलं नाही. तसंच चौथ्या टी-20 आधी प्रॅक्टिस करताना गिलच्या पायाला दुखापत झाली, त्यामुळे तो सीरिजमधूनही बाहेर झाला आहे. शुभमन गिल वेळेत फिट झाला नाही तर त्याला टी-20 वर्ल्ड कपला मुकावं लागू शकतं.
