नीरजा-प्रोतिमा पुन्हा आल्या एकत्र! चिमुकल्या मायराबरोबर रंगल्या स्नेहा वाघच्या गप्पा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री मायरा वायकुळ आणि अभिनेत्री स्नेहा वाघ यांनी देवीचं दर्शन घेतलं. पाहा दोघींचे सुंदर फोटो.
advertisement
1/7

प्रेक्षकांची लाडकी बालकलाकार म्हणजेच अभिनेत्री मायरा वायकुळ. मायरा नुकतीच तिच्या ऑनस्क्रिन आईला भेटली.
advertisement
2/7
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेनंतर मायरानं नीरजा ही हिंदी मालिका केली. या मालिकेत अभिनेत्री स्नेहा वाघ प्रमुख भूमिकेत होती.
advertisement
3/7
स्नेहानं साकारलेली प्रोतिमा आणि मायरानं साकारलेली चिमुकली नीरजा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. मालिकेदरम्यान दोघींनी ऑनस्क्रिन आणि नंतर ऑफस्क्रिन बॉन्डिंग पाहायला मिळालं.
advertisement
4/7
मालिकेनंतर प्रोतिमा आणि नीरजा यांना नवरात्रीनिमित्तानं पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळालं. मायरा आणि स्नेहा वाघ यांनी एकत्रित देवीचं दर्शन घेतलं.
advertisement
5/7
स्नेहा आणि मायरा यांनी परळच्या करीरोड येथील जपाच्या देवीचे दर्शन घेतलं. देवीचं दर्शन घेतनाचे फोटो त्यांनी शेअर केलेत.
advertisement
6/7
खूप दिवसांनी भेटल्यानंतर मायरा आणि स्नेहा यांच्या मस्त गप्पा देखील रंगल्या. दोघींचा हा प्रेमळ क्षण कॅमेरात कैद करण्यात आलाय.
advertisement
7/7
मायराचे आई-बाबा देखील देवीच्या दर्शनासाठी उपस्थित होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
नीरजा-प्रोतिमा पुन्हा आल्या एकत्र! चिमुकल्या मायराबरोबर रंगल्या स्नेहा वाघच्या गप्पा