TRENDING:

'कोणालाही किस करणं, चादर ओढून इंटिमेट होणं...', प्रसिद्ध रिॲलिटी शोबद्दल अभिनेत्रीचा शॉकिंग खुलासा

Last Updated:
प्रसिद्ध शोमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या अभिनेत्रीने नुकताच या शोबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे, ज्यामुळे प्रेक्षक आणि सिनेसृष्टी दोन्ही हादरले.
advertisement
1/7
'चादर ओढून इंटिमेट होणं...', प्रसिद्ध रिॲलिटी शोबद्दल अभिनेत्रीचा शॉकिंग खुलासा
मुंबई: ‘उल्लू ॲप’वरील ‘हाऊस अरेस्ट’ हा रिॲलिटी शो त्याच्या अति-वादग्रस्त आणि अश्लील कंटेंटमुळे काही दिवसांपूर्वीच बंद करण्यात आला होता. या शोमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या अडल्ट अभिनेत्री नेहल वडोलिया हिने नुकताच या शोबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे, ज्यामुळे प्रेक्षक आणि सिनेसृष्टी दोन्ही हादरले.
advertisement
2/7
‘गलाटा इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत नेहल वडोलियाने ‘हाऊस अरेस्ट’च्या सेटवरचा अनुभव सांगितला. ती म्हणाली, “तो शो बंद झाला, ते एका अर्थी खरंच चांगलं झालं! कारण पुढे जे एपिसोड्स शूट झाले होते आणि जे मी पाहिलं होतं, ते आणखी खराब होतं.”
advertisement
3/7
शोमध्ये पुढे इंटिमसीपर्यंतच्या गोष्टी दाखवल्या जाणार होत्या. नेहल म्हणाली की, जर पुढे जे घडणार होतं, ते उघड झालं असतं, तर अजून काय काय बंद करावं लागलं असतं हे माहीत नाही!
advertisement
4/7
शोमध्ये नेमके कोणत्या प्रकारचे सीन्स आणि टास्क पाहिले, या प्रश्नावर नेहलने जे उत्तर दिलं, ते ऐकून अनेकांना धक्का बसला. “तुम्ही आतापर्यंत जे काही पाहिलं, ते फक्त १० टक्के होतं. पुढे शोमध्ये आणखी अश्लील भाषा आणि अश्लील सीन्स होते,” असं नेहलने स्पष्ट केलं.
advertisement
5/7
नेहलने शोच्या वातावरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ती म्हणाली, “एखाद्या टास्कदरम्यान काही केलं, तर समजू शकतो. पण काहीच कारण नसताना तुम्ही जाऊन कोणाला किस करत असाल, तर तुम्हाला नेमकं काय सिद्ध करायचं आहे?”
advertisement
6/7
नेहलने अतिशय गंभीर विधान केलं. “खऱ्या आयुष्यात तुम्ही असं कोणालाही जाऊन किस करता का? तिथे तर चादर ओढून काहीही केलं जात होतं! मी तर फक्त किसिंगबद्दल बोलतेय. तिथे असं काहीच नव्हतं जे घडत नव्हतं. कोणीही कोणासोबतही लिपलॉक करत होतं,” असा भयानक अनुभव तिने सांगितला.
advertisement
7/7
नेहलने शोमध्ये जाण्यापूर्वी एक करार केला होता. तिने स्पष्ट केलं होतं की, कोणत्याही टास्कशिवाय मी कोणाला स्पर्श करणार नाही आणि शिवीगाळही करणार नाही. पण, सेटवर तिने जे पाहिलं, ते तिच्या कल्पनेपलीकडचं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'कोणालाही किस करणं, चादर ओढून इंटिमेट होणं...', प्रसिद्ध रिॲलिटी शोबद्दल अभिनेत्रीचा शॉकिंग खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल