Marathi Cinema: फक्त सैराटच नाही तर 'या' 5 मराठी सिनेमांनीही तोडले कमाईचे रेकॉर्ड, तुम्ही पाहिलेत का?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Marathi superhit cinema: 'सैराट' हा मराठी चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.अशात काही मराठी सिनेमांविषयी जाणून घेऊया जे सैराटप्रमाणे चर्चेत राहिले.
advertisement
1/7

मराठी सिनेमाची चर्चा झाली तर सुपरहिट सिनेमांमध्ये प्रेक्षकांच्या मनात पहिलं नाव येतं ते म्हणजे 'सैराट'. 2016 मध्ये प्रदर्शित झालेला 'सैराट' हा मराठी चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळाले की 2018 मध्ये करण जोहरने या चित्रपटाचा हिंदी रिमेक 'धडक' बनवला.
advertisement
2/7
जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरचा 'धडक' चित्रपटही प्रेक्षकांना आवडला होता. 'सैराट'ला अजूनही प्रेक्षकांमध्ये प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. मात्र अशा काही मराठी सिनेमांविषयी जाणून घेऊया जे सैराटप्रमाणे चर्चेत राहिले.
advertisement
3/7
बाईपण भारी देवा - गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या या कमी बजेटच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर त्याच्या खर्चापेक्षा अधिक कमाई केली होती. 5 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 92 कोटींहून अधिक कमाई केली होती. डिस्ने प्लस हॉटस्टारवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.
advertisement
4/7
रितेश देशमुख दिग्दर्शित आणि रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख अभिनीत 'वेड' या चित्रपटानेही मराठी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर देखील उपलब्ध आहे.
advertisement
5/7
माधुरी दीक्षितचा 2018 चा चित्रपट 'बकेट लिस्ट' सोनी लिव्हवर उपलब्ध आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षित एका गृहिणीच्या भूमिकेत दिसली होती जी तिच्या आयुष्यात अनेक भूमिका साकारते.
advertisement
6/7
नटसम्राट- नाना पाटेकर, मेधा माजरेकर यांचा 'नटसम्राट' हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तुम्ही Amazon Prime वर पाहू शकता.
advertisement
7/7
हरिश्चंद्राची फॅक्टरी- 2009 मध्ये आलेल्या 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. नंदू माधव, विभावरी देशपांडे स्टारर हा चित्रपट एक जबरदस्त कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Marathi Cinema: फक्त सैराटच नाही तर 'या' 5 मराठी सिनेमांनीही तोडले कमाईचे रेकॉर्ड, तुम्ही पाहिलेत का?