TRENDING:

November OTT Release : दिवाळी झाली, फराळही संपला, नोव्हेंबरमध्ये काय करायचं! OTT वर Films आणि सीरिजची ट्रीट

Last Updated:
November OTT Release : ओटीटीप्रेमींसाठी नोव्हेंबर महिना खूप खास आहे. नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ, सोनी लिव्ह सारख्या प्लॅटफॉर्मवर थ्रिलर, ड्रामा, अॅक्शनसह विविध चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत.
advertisement
1/7
November OTT Release : OTT वर  Films आणि सीरिजची ट्रीट
नोव्हेंबर महिन्यात ओटीटीप्रेमींना घरबसल्या मनोरंजनाची चांगलीच ट्रीट मिळणार आहे. दिवाळीनंतर आता ओटीटीवर वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या, वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट आणि वेबसीरिज रिलीज होणार आहेत. थ्रिलर, ड्रामा, अॅक्शन अशा सर्व जॉनरचे चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
advertisement
2/7
बारामूला : थ्रिलर आणि सस्पेंस प्रकाराच्या गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर 'बारामूला' ही तुमच्यासाठी परफेक्ट सीरिज आहे. काश्मीरच्या सौंदर्यातील रहस्यमय कथानक या सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. 7 नोव्हेंबरला ही सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे.
advertisement
3/7
महारानी सीझन 4 : हुमा कुरैशी पुन्हा एकदा रानी भारतीच्या माध्यमातून ओटीटीवर जलवा करण्यास सज्ज आहे. राजकारणावर भाष्य करणारी ही सीरिज 7 नोव्हेंबरपासून सोनी लिव्हवर तुम्हाला पाहता येईल.
advertisement
4/7
दिल्ली क्राइम सीझन 3 : शेफाली शाह पुन्हा एकदा जीआयजी वर्तिका चतुर्वेदीच्या माध्यमातून ओटीटी गाजवणार आहे. दिल्ली क्राइमच्या आधीच्या दोन सीझनला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. आता तिसऱ्या सीझनची चाहत्यांना उत्सुकता आहे. 'दिल्ली क्राइम 3' नेटफ्लिक्सवर 13 नोव्हेंबरला रिलीज होत आहे.
advertisement
5/7
जॉली एलएलबी 3 : अक्षय कुमार आणि अरशद वारसी ही जोडी पुन्हा एकदा कोर्टरूम ड्रामाच्या माध्यमातून धमाल करायला तयार आहे. 'जॉली एलएलबी 3'मध्ये कॉमोडी, इमोशन आणि सत्याचा सामना दाखवण्यात आला आहे. थिएटरमध्ये हा चित्रपट पाहायचा राहुन गेला असेल तर 14 नोव्हेंबरपासून नेटफ्लिक्स आणि डिज्नी प्लस हॉटस्टारवर नक्की पाहा.
advertisement
6/7
फॅमिली मॅन सीझन 3 : मनोज बाजपेयी अभिनीत 'फॅमिली मॅन सीझन 3'मध्ये प्रेक्षकांना अॅक्शन आणि भावनांची सांगड घातलेली पाहायला मिळेल. आधीच्या दोन्ही सीझनपेक्षा तिसरा सीझन खूप वेगळा असणार असल्याचं म्हटलं जात आहे. 21 नोव्हेंबरपासून प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल.
advertisement
7/7
स्ट्रेंजर थिंग्स सीझन 5 : 'स्ट्रेंजर थिंग्स'चा पाचवा सीझन ओटीटीवर धमाका करण्यास सज्ज आहे. या सीझनची जगभरातील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. नेटफ्लिक्सवर 26 नोव्हेंबरपासून प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
November OTT Release : दिवाळी झाली, फराळही संपला, नोव्हेंबरमध्ये काय करायचं! OTT वर Films आणि सीरिजची ट्रीट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल