'प्रत्येक 2 मिनिटांनी OTP...' RJ महावशचं अकाऊंट हॅक, इन्स्टा स्टोरी ठेवून हॅकर्सचीच लावली वाट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
RJ Mahvash : लोकप्रिय इन्फ्लुएन्सर आणि आरजे महवश हिचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न झाला. तिने हॅकरला जबरदस्त उत्तर दिलं.
advertisement
1/6

मुंबई: सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असणारी, लोकप्रिय इन्फ्लुएन्सर आणि आरजे महवश हिच्यासोबत नुकताच एक मजेशीर किस्सा घडला आहे.
advertisement
2/6
कोणीतरी तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे, पण महवशने या हॅकरला घाबरण्याऐवजी, एका वेगळ्याच अंदाजात विनंती केली आहे, जी सध्या खूप व्हायरल होत आहे.
advertisement
3/6
महवशने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ती हॅकरला उद्देशून म्हणाली, "जो कोणी माझं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याने तो प्रयत्न थांबवावा. आम्ही मेटा टीमच्या मदतीने ते परत मिळवू. पण बाबा, दर दोन मिनिटांनी ओटीपी पाठवू नकोस. माझ्या छोले-भटुरेंची ऑर्डर येणार आहे, आणि या ओटीपीमुळे गोंधळ होतोय."
advertisement
4/6
महवशने या पोस्टमध्ये अगदी हलक्याफुलक्या पद्धतीने हॅकरला उत्तर दिलं आहे. यामुळे तिने तिच्या चाहत्यांना ही तिच्या अकाऊंटमध्ये काहीतरी गडबड सुरू असल्याची माहिती दिली आहे.
advertisement
5/6
आरजे महवश गेल्या काही काळापासून तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. क्रिकेटपटू युजी चहल सोबत तिचं नाव जोडलं जात आहे. दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या अनेक अफवा पसरल्या आहेत.
advertisement
6/6
मात्र, महवशने अनेकदा हे स्पष्ट केलं आहे की, 'मी आणि चहल फक्त चांगले मित्र आहोत.' तरीही, जेव्हा जेव्हा हे दोघे एकत्र दिसतात, तेव्हा त्यांच्या नात्याची चर्चा सुरू होते. पण प्रत्येक वेळी या अफवा खोट्या असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'प्रत्येक 2 मिनिटांनी OTP...' RJ महावशचं अकाऊंट हॅक, इन्स्टा स्टोरी ठेवून हॅकर्सचीच लावली वाट