अनेकदा पालकांना मुलांना स्वतंत्रपणे खेळण्यासाठी प्रोत्साहित करणे अवघड जाऊ शकते. मात्र लहान मुलांना स्वतंत्रपणे खेळण्यासाठी प्रोत्साहित करणे इतकेही अवघड नाही. आज आम्ही तुम्हाला यासाठीच काही सोप्या टिप्स देणार आहोत.
सुरक्षित वातावरण तयार करा : मुलांना स्वतंत्रपणे खेळू देण्यासाठी सर्वात आधी त्यांचे खेळण्याचे ठिकाण सुरक्षित आहे का, याची खात्री करा. खेळणी मुलांसाठी योग्य आहेत का, त्यांच्या खेळण्याच्या जागेवर कोणताही धोका नाही ना, हे तपासा. यामुळे तुम्हाला काळजी राहणार नाही आणि मुलालाही मोकळेपणाने खेळता येईल. त्यांना स्वतःच्या जागेत सुरक्षित वाटल्यास ते जास्त वेळ एकाग्रतेने खेळतील.
advertisement
खेळणी मर्यादित ठेवा : मुलांसमोर खूप जास्त खेळणी ठेवल्यास त्यांना गोंधळल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे एका वेळी फक्त काहीच खेळणी त्यांच्यासमोर ठेवा. निवडक खेळणी असल्याने मुलं त्यांच्यासोबत जास्त खेळतील आणि त्यांची कल्पनाशक्ती वापरायला शिकतील. तुम्ही खेळणी वेळोवेळी बदलू शकता, ज्यामुळे त्यांना प्रत्येक वेळी काहीतरी नवीन मिळेल.
सुरुवातीला सोबत बसा : तुम्ही तुमच्या मुलाला स्वतंत्रपणे खेळायला शिकवत असाल, तर सुरुवातीला तुम्ही त्यांच्यासोबत थोडा वेळ बसा. तुम्ही तिथे असल्यामुळे त्यांना सुरक्षित वाटेल. तुम्ही त्यांच्यासोबत खेळू नका, फक्त जवळ बसून त्यांना खेळताना पाहा. त्यानंतर हळूहळू तुम्ही खोलीतून बाहेर जाऊ शकता. यामुळे मुलांना समजेल की, तुम्ही त्यांच्यासोबत नसतानाही ते सुरक्षित आहेत.
कौतुक करा : जेव्हा तुमले मूल स्वतःहून खेळेल, तेव्हा त्याचे कौतुक करा. त्यांना सांगा की, 'तू किती छान एकटा खेळत आहेस!' यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल आणि त्यांना पुन्हा असे खेळण्यास प्रोत्साहन मिळेल. मुलांना हे समजेल की त्यांची ही सवय चांगली आहे आणि पालक त्याचे कौतुक करत आहेत.
नवीन गोष्टी शोधण्यास प्रोत्साहित करा : मुलांना वेगवेगळ्या वस्तू आणि खेळण्यांचा वापर करून नवीन गोष्टी तयार करायला शिकवा. त्यांना सांगा की, एकाच खेळण्याने वेगवेगळ्या प्रकारे खेळता येते. मुलांना बॉक्स, ब्लॉक्स किंवा इतर साध्या वस्तू देऊन त्यातून काहीतरी नवीन बनवायला प्रोत्साहित करू शकता. यामुळे त्यांची सर्जनशीलता वाढेल आणि ते स्वतःच समस्या सोडवायला शिकतील.
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
हे ही वाचा: Parenting Tips : वेळीच मुलांमध्ये रुजवा दयाळूपणा, या टिप्स मुलांना चांगली व्यक्ती बनायला करतील मदत