TRENDING:

प्रसिद्ध अभिनेता तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार? वेडिंग कार्ड छापले, वेन्यूही ठरला

Last Updated:
Famous Actor : प्रसिद्ध अभिनेता तिसऱ्यांदा बोहल्यावर अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचे वेडिंग कार्ड छापले गेले असून वेन्यूही ठरला आहे.
advertisement
1/7
प्रसिद्ध अभिनेता तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार? वेडिंग कार्ड छापले, वेन्यूही ठरला
पवन सिंह सध्या आपल्या 40 व्या वाढदिवसानिमित्त चर्चेत आहे. त्याच्या वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्यासोबत एक अभिनेत्रीदेखील दिसत आहे.
advertisement
2/7
पवन सिंहच्या बर्थडे पार्टीत भोजपुरी अभिनेत्री महिमा सिंह जास्त चर्चेत आली आहे. महिमा सिंह पवन सिंहसोबत गळ्यात मंगळसूत्र आणि भांगेत कुंकू लावून फिरत होती. त्यामुळे घटस्फोट न घेता पवन सिंहने तिसरं लग्न केलं असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
advertisement
3/7
महिमा सिंहने आपल्या सोशल मीडियावरुन आठ फोटो वगळता इतर सर्व फोटो हटवले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री पवन सिंहसोबत दिसत आहे. किंवा एखाद्या सिनेमाचं पोस्टर तिने शेअर केलं आहे. याच कारणांमुळे त्यांच्या नात्यासंबंधित चर्चांना सुरुवात झाली आहे.
advertisement
4/7
पवन सिंह तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. दरम्यान अभिनेत्याच्या काकांनी याबाबत मौन सोडलं आहे. पवन सिंहचे काका म्हणाले,"लग्न हा भातुकलीचा खेळ नव्हे".
advertisement
5/7
पवन सिंहचा अद्याप दुसरी पत्नी ज्योती सिंहसोबतही घटस्फोट झालेला नाही. याबाबत बोलताना त्याचे काका म्हणाले,"त्यांच्या घटस्फोटाचं प्रकरण सध्या कोर्टात सुरू आहे". दरम्यान त्याच्या काकांनी हिंट दिली की, घटस्फोटानंतर पवन सिंह तिसरं लग्न करू शकतो".
advertisement
6/7
पवन सिंह आपल्या तिसऱ्या लग्नाबाबत बोलताना रिपब्लिक भारतला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला,"माझा मोठा चाहतावर्ग आहे. काही चाहत्यांनी तर माझी लग्नपत्रिकादेखील छापली आहे. लग्नाचा वेन्यूदेखील ठरवला आहे. लग्न मुंबईत पार पडणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे".
advertisement
7/7
पवन सिंहच्या या वक्तव्यावरुन हे स्पष्ट होतं की तो लग्नबंधनात अडकणार नाही. पण अद्याप महिमा सिंहकडून याबाबत काहीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्रसिद्ध अभिनेता तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार? वेडिंग कार्ड छापले, वेन्यूही ठरला
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल