TRENDING:

Pooja Birari : आधी हसली, मग लाजली! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांवर पहिल्यांदाच बोलली पूजा बिरारी

Last Updated:
Pooja Birari-Soham Bandekar : अभिनेत्री पूजा बिरारी पहिल्यांदाच तिच्या आणि सोहम बांदेकरच्या रिलेशनशिप आणि लग्नाच्या चर्चांवर बोलली आहे. त्यांच्या अफेअरबद्दल सगळ्यांना पहिल्यांदा कळलं तेव्हा नेमकं काय घडलं याबद्दल तिने सांगितलं.
advertisement
1/10
आधी हसली, मग लाजली! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चावर पूजा पहिल्यांदाच बोलली
येड लागलं प्रेमाचं या मालिकेतील अभिनेत्री पूजा बिरारी मागील काही दिवसांपासून तिची पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.
advertisement
2/10
पूजा बिरारी अभिनेते आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकरला डेट करत असल्याची माहिती समोर आली. या बातमीनंतर आता दोघांचं लग्न कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
advertisement
3/10
सोहम आणि पूजा डेट करत असले तरी त्यांनी याबाबत अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिलेली नाही. दरम्यान गणपतीत पूजा बिरारी आदेश बांदेकर यांच्या घरी पूजेसाठी पोहोचली होती.
advertisement
4/10
पूजा संपूर्ण बांदेकर फॅमिलीसोबत गणपती बाप्पाची आरती करताना दिसली होती. त्यानंतर या दोघांच्या डेटींगच्या चर्चा कन्फर्म झाल्या.
advertisement
5/10
पूजा आता बांदेकरांच्या घरच्या सून होणार आहे. दोघांनी अधिकृतरित्या काही सांगितलेलं नसलं तरी दोघांच्या बोलण्यातून आणि एक्सप्रेशन्समधून ते रिलेशनमध्ये असून लवकरच लग्न करणार असल्याचं दिसून आलं.
advertisement
6/10
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत, मालिकेतील राया खूपच तापट आहे पण खऱ्या आयुष्यातील राया खूपच शांत आहे त्याबद्दल काय सांगशील असा प्रश्न पूजाला विचारण्यात आला.
advertisement
7/10
या प्रश्नाचं उत्तर देताना पूजा प्रचंड लाजली. ती हळूच हसत म्हणाली, "नाही, मला यावर काही नाही म्हणायचं. इतक्यात तरी काही नाही म्हणायचं यावर."
advertisement
8/10
डेटिंगची बातमी सगळ्यांना समजली तेव्हा तुला खूप फोन आले असतील असा प्रश्न विचारला असता पूजा म्हणाली, "मी आता काय बोलू आणि काय नको असं होतंय."
advertisement
9/10
पूजा म्हणाली, "मी सेटवर कधीच झोपत नाही. त्यादिवशी मी झोपले होते सेटवर. आमचं डे नाईट डे नाईट सुरू होतं, मधे थोडा गॅप होता म्हणून मी झोपले."
advertisement
10/10
"मी झोपून उठले तेव्हा मला असे भरमसाठ मिस्ड कॉल्स होते. ठीक आहे आता, याहून जास्त मी काही नाही बोलत."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Pooja Birari : आधी हसली, मग लाजली! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांवर पहिल्यांदाच बोलली पूजा बिरारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल