Prajakta Gaikwad : 'त्यात काहीही चुकीचं नव्हतं', प्राजक्ताची लग्नात नंदीवरून एन्ट्री, ऑनस्क्रिन वडिलांनी ट्रोलर्सना झापलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला तिच्या लग्नात नंदीवरून घेतलेल्या एन्ट्रीमुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं. या ट्रोलिंगवर तिचे ऑनस्क्रिन वडील आणि ज्योतिषी आनंद पिंपळकर यांनी उत्तर देत ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे.
advertisement
1/8

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज खुटवड यांचं लग्न सध्या मराठी मनोरंजन विश्वातील सर्वात चर्चेचा विषय ठरलं आहे. अत्यंत भव्य, शाही थाटामाटात पार पडलेलं हे लग्न सोशल मीडियावर चर्चेत आलं. या सगळ्यात प्राजक्ता आणि शंभुराज यांनी रिसेप्शनसाठी नंदीवरून एन्ट्रीची सर्वाधिक चर्चा झाली.
advertisement
2/8
प्राजक्ता आणि शंभुराज यांनी मोठ्या नंदीवर बसून मंडपात एन्ट्री घेतली. त्यांच्या पुढे भगवान शंकर आणि शिवगणांचा देखावा सादर करण्यात आला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मात्र काहींनी प्राजक्तावर धार्मिक भावनांचा अपमान केल्याचा आरोप करत तिला ट्रोल करायला सुरुवात केली.
advertisement
3/8
प्राजक्ताचे ऑनस्क्रीन वडील आणि प्रसिद्ध ज्योतिषी, वास्तूतज्ञ आनंद पिंपळकर यांनी प्राजक्तला ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. पिंपळकर हे स्वतः प्राजक्ताच्या लग्नाला उपस्थित होते आणि त्यांनीच तिचं कन्यादान केलं. त्यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर करत संपूर्ण वादावर भाष्य केलं आणि ट्रोलिंग करणाऱ्यांना झापलं.
advertisement
4/8
पिंपळकर यांनी व्हिडीओमध्ये सांगितलं, "दोन दिवसांपूर्वी आपल्या लाडक्या अभिनेत्री प्राजक्ताचा विवाह झाला. विवाहापूर्वी नवरा नवरीची नंदीवरून करण्यात आलेली एन्ट्री अनेकांना खटकली. महादेव आणि शिवगण नवरा नवरीसमोर नाचत असल्याने काहींना ते चुकीचं वाटलं. पण माहिती नसणं आणि चुकीचं वाटणं स्वाभाविक आहे. मात्र माहिती न घेता सोशल मीडियावर ट्रोल करणं चुकीचं आहे."
advertisement
5/8
ते पुढे म्हणतात, "विवाहाच्या क्षणी नवरा नवरी हे फक्त नर–नारी नसतात. धर्मशास्त्रानुसार ते विष्णू लक्ष्मीच्या स्वरूपात विराजमान होतात. विवाहमंत्रात स्पष्ट म्हटलं जातं 'त्वं लक्ष्मीरसि, अयं विष्णूरसि.' म्हणजेच त्या क्षणी नवरा नवरी हे देवस्वरूप मानले जातात.”
advertisement
6/8
पिंपळकरांनी पुराणातील संदर्भ देत सांगितलं की, "लक्ष्मी नारायणाच्या विवाहाला भगवान शंकर स्वतः गणांसह उपस्थित होते, असा उल्लेख पद्मपुराण, स्कंदपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण या तिन्ही पुराणांमध्ये आहे. तेव्हा विवाहसोहळ्यात शिवगणांचा देखावा दाखवणं हे अज्ञान नाही. धर्माचा किंवा देवी देवतांचा अपमान नाही. तर तो क्षण पुन्हा सादर करायचा आणि प्राचीन पुराण परंपरेचं मूर्त स्वरूप आपल्या समोर आणायचा हा यामागचा हेतू आहे."
advertisement
7/8
लग्नात नंदिचं महत्त्व सांगताना पिंपळकर म्हणाले, "नंदी म्हणजे फक्त बैल नाही. तो धर्मस्वरुप आहे. शास्त्रामध्ये स्पष्ट लिहिलं आहे. विवाह हा धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरूषार्धांपैकी पहिल्या धर्म या घटकाचा शुभारंभ असल्याने नंदी अत्यंत मंगल मानला जातो."
advertisement
8/8
"विवाहात नंदी, शिव, शिवगण, शिवात्मक देखावा सादर करणं शास्त्रसिद्ध, पुराणसिद्ध आणि धर्म परंपरेला अनुसरून आहे. यावरून ट्रोल करणारे लोक ना पुराण ओळखतात ना संस्कृती", असंही ते म्हणाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Gaikwad : 'त्यात काहीही चुकीचं नव्हतं', प्राजक्ताची लग्नात नंदीवरून एन्ट्री, ऑनस्क्रिन वडिलांनी ट्रोलर्सना झापलं