Prajakta Gaikwad: लग्नानंतर प्राजक्ता गायकवाडचा पहिलाच चित्रपट, 'महाराणी येसुबाईं'नंतर साकारणार 'ही' ऐतिहासिक भूमिका
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Prajakta Gaikwad upcoming movie: लग्नानंतर प्राजक्ताचा हा पहिलाच प्रोजेक्ट असल्याने ती कसं काम करतेय हे पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक झाले आहेत.
advertisement
1/7

पुण्यातील शनिवारवाड्याच्या जवळ असलेला 'भिडेवाडा' केवळ दगड-विटांची भिंत नसून महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या स्त्री-शिक्षणाचा उगम जिथे झाला, ती एक पवित्र पावनभूमी! महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजाचा रोष पत्करून जिथे पहिली मुलींची शाळा सुरू केली, त्या वाड्याचा इतिहास आता रुपेरी पडद्यावर जिवंत होणार आहे.
advertisement
2/7
'भिडेवाडा' या आगामी मराठी चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं असून, या चित्रपटात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिका कोण साकारणार, यावरून पडदा सरकला आहे. ऐतिहासिक भूमिकांना आपल्या दमदार अभिनयाने न्याय देणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आता सावित्रीबाई फुलेंच्या आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे.
advertisement
3/7
गेल्याच वर्षी प्राजक्ताने आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली. ऑगस्ट 2025 मध्ये प्राजक्ताने शंभुराज खुटवडशी साखरपुडा केला होता आणि आता 2 डिसेंबर रोजी ही जोडी बोहल्यावर चढली. लग्नानंतर प्राजक्ताचा हा पहिलाच प्रोजेक्ट असल्याने ती कसं काम करतेय हे पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक झाले आहेत.
advertisement
4/7
प्राजक्ताने यापूर्वी अनेक ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत, पण स्त्री-शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या माऊलीची भूमिका साकारणं हे तिच्यासाठी एक मोठं स्वप्न असल्याचं बोललं जातंय. तर, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते धीरेश जोशी पाहायला मिळणार आहेत. या दोन दिग्गजांची जुगलबंदी पाहणं प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच ठरेल.
advertisement
5/7
'भिडेवाडा' हा चित्रपट केवळ इतिहासावर भाष्य करणारा नाही, तर त्या इतिहासातून प्रेरणा घेऊन आजच्या युगातील एक तरुण मुलगी आपल्या स्वप्नांसाठी आणि शिक्षणासाठी कशी लढते, याची गुंफण या कथेत करण्यात आली आहे. म्हणजेच, हा चित्रपट जुन्या काळातील संघर्षाची नाळ आजच्या पिढीच्या जिद्दीशी जोडणार आहे. शिवमुद्रा स्टुडिओज आणि राघो फिल्म्सच्या वतीने या सामाजिक चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
advertisement
6/7
भिडेवाडा ही वास्तू सध्या वादाच्या भोवऱ्यात आणि जीर्ण अवस्थेत असली, तरी या चित्रपटाच्या निमित्ताने तिचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे. "शिक्षणाशिवाय गत्यंतर नाही" हा जोतिबांचा विचार हा सिनेमा किती प्रभावीपणे मांडतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
advertisement
7/7
या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवानी राजेशिर्के आणि अजित शिरोळे या जोडीने केलं आहे. केवळ प्राजक्ता आणि धीरेशच नाही, तर माधव अभ्यंकर, वैभव चव्हाण, ऋतुराज वानखेडे आणि ओंकार भोजने यांसारखे कलाकारही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. सागर शिंदे यांचं संगीत आणि योगेश कोळी यांचं छायांकन या चित्रपटाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार आहे.<span style="font-size: 20px;"> </span><span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Gaikwad: लग्नानंतर प्राजक्ता गायकवाडचा पहिलाच चित्रपट, 'महाराणी येसुबाईं'नंतर साकारणार 'ही' ऐतिहासिक भूमिका