TRENDING:

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी पुढचे 15 दिवस नॉट रिचेबल! पण का? स्वत:च पोस्ट लिहित सांगितलं

Last Updated:
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी पुढील 15 दिवस नॉट रिचेबल असणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्राजक्ता हा निर्णय का घेतला?
advertisement
1/8
अभिनेत्री प्राजक्ता माळी पुढचे 15 दिवस नॉट रिचेबल! पण का? पोस्ट लिहित सांगितलं
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्यांशी थेट संवाद साधणे, फोटो-व्हिडीओ शेअर करणे आणि आयुष्यातील खास क्षण ती तिथे शेअर करत असते.
advertisement
2/8
मात्र आता प्राजक्ता पुढचे 15 दिवस चाहत्यांसाठी नॉट रिचेबल असणार आहे. ही माहिती तिने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे.
advertisement
3/8
प्राजक्ताने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर केली. Bye Bye Phone for next 15 days असं म्हणत तिनं ही पोस्ट शेअर केली आहे.
advertisement
4/8
म्हणजेच पुढील 15 दिवस ती मोबाईल वापरणार नाही म्हणजेच ती नॉट रिचेबल असणार आहे. प्राजक्ता नेमकी गेली कुठे आहे? ती फोन का बंद करणार आहे असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
advertisement
5/8
नेहमी चाहत्यांशी कनेक्ट राहणारी प्राजक्ता अचानक ऑफलाइन जाणार असल्याने चाहत्यांना आश्चर्य वाटले. यामागचं कारण म्हणजे बंगळुरूमधील आर्ट ऑफ लिविंग कोर्स. प्राजक्ता सध्या बंगळुरू येथे आश्रमात गेली आहे. हा आश्रम आध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांनी स्थापन केला आहे. ध्यान, योग, श्वसनक्रिया आणि मानसिक शांततेसाठी जगभरातून लोक येथे येतात.
advertisement
6/8
प्राजक्ताने आश्रमातील प्रसिद्ध विशालाक्षी मंडपातील व्हिडीओही शेअर केला आहे. विशालाक्षी मंडप हा आश्रमातील प्रमुख ध्यानस्थळांपैकी एक मानला जातो. शांत, निसर्गरम्य आणि सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या या ठिकाणी प्राजक्ता पुढील 15 दिवस साधना आणि आत्मचिंतन करणार आहे.
advertisement
7/8
नेहमीच ग्लॅमरस लूक, फॅशन आणि कामाच्या अपडेट्स देणारी अभिनेत्री अचानक डिजिटल डिटॉक्स घेणार असल्याने अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. आजच्या धावपळीच्या आणि सोशल मीडियाच्या युगात स्वत:साठी वेळ काढणं अनेकांना जमत नाही. अशा वेळी प्राजक्ताने घेतलेला प्रेरणादायी निर्णय घेतला आहे.
advertisement
8/8
कलाकारांचे आयुष्य सतत प्रकाशझोतात असते. कामाचा ताण, सततचा प्रवास आणि सोशल मीडियाचा दबाव यामुळे मानसिक थकवा येऊ शकतो. अशा वेळी अध्यात्म आणि ध्यानाचा आधार घेणे अनेक जण पसंत करतात. प्राजक्तानेही स्वत:साठी हा वेळ राखून ठेवत 15 दिवसांचा ब्रेक घेतला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी पुढचे 15 दिवस नॉट रिचेबल! पण का? स्वत:च पोस्ट लिहित सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल