रस्ते अपघातात गमावले वडिल, 2 महिन्यांनी पहिल्यांदा व्यक्त झाली प्रार्थना बेहेरे, म्हणाली, 'आज बाबा नाहीयेत पण...'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Prarthana Behere : अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या वडिलांचं रस्ते अपघातात निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर 2 महिन्यांनी प्रार्थना बेहेरे पहिल्यांदा व्यक्त झाली आहे.
advertisement
1/7

प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. दोन महिन्यांआधी प्रार्थनावर दु:खाचा डोंगर कोसळला. प्रार्थनाच्या वडिलांचं रस्ते अपघातात निधन झालं. वडिलांच्या निधनाची माहिती प्रार्थनानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली होती. वडिलांच्या निधनाच्या 2 महिन्यांनी प्रार्थना पहिल्यांदा समोर आली. वडिलांच्या आठवणीत प्रार्थनाला अश्रू अनावर झाले.
advertisement
2/7
[caption id="attachment_1493987" align="aligncenter" width="1200"] प्रार्थनानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिनं वडिलांविषयी भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, "नमस्कार, आजचा व्हिडिओ करतेय कारण आज 14 तारीख आहे. आज दोन महिने झाले माझ्या बाबांना जाऊन. बाबांसाठी हा व्हिडिओ आहे. मला खरंतर आज काहीच सुचत नाहीये कारण मी आजवर तुमच्या कोणासमोरच व्यक्त झाले नाही"</dd> <dd>[/caption]
advertisement
3/7
"मला काय वाटतंय हे तुम्हाला कळलंय. मी तुमचे मेसेजेस वाचले. कधीच अशाप्रकारे व्यक्त झालेले नाही. पण ते दु:ख आहे आणि आता ते कायम राहणार आबे. ते मी सांगू शकत नाहीये."
advertisement
4/7
प्रार्थनाने पुढे सांगितलं, "माझे बाबा नेहमी मला म्हणायचे आयुष्यात नेहमी खूश राहा. आनंदी राहायचा प्रयत्न कर. तू एक अभिनेत्री आहेस. सगळ्यांचं मनोरंजन करायचं काम आहे तुझं. कायम तुझं काम चोख कर, छान कर. ते असताना मी जे काम केलं होतं ते आता ते नसताना येणार आहे. त्यांचे आशीर्वाद असणार आहेत पण मला तुमचेही आशीर्वाद हवे आहेत."
advertisement
5/7
"बाबा मला नेहमी म्हणायचे मी तुझा खूप मोठा फॅन आहे. आता बाबा तर नाहीयेत पण मला माहितीये तुम्ही सगळे माझ्याबरोबर आहात मला सपोर्ट करायला."
advertisement
6/7
प्रार्थनाने तिच्या नव्या कामाची माहिती दिली. ती म्हणाली, "मी उद्या काहीतरी स्पेशल घेऊन येतेय. जे खरंतर माझ्या बाबांसाठी आहे. तुम्हा सगळ्यांसाठी आहे. यासाठी मला तुमचा सपोर्ट, आशीर्वाद हवाय. मला खात्री आहे तुम्हाला हे आवडेल."
advertisement
7/7
"हे काम बाबा असताना त्यांनी बघितलं होतं आणि आता ते नसताना ते रिलीज होणार आहे. फक्त तुमचा सपोर्ट हवा आहे. उद्या ते काम रिलीज झाल्यानंतर तुमचे आशीर्वाद माझ्यावर कायम ठेवा…थँक्यू सो मच"
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रस्ते अपघातात गमावले वडिल, 2 महिन्यांनी पहिल्यांदा व्यक्त झाली प्रार्थना बेहेरे, म्हणाली, 'आज बाबा नाहीयेत पण...'