IPL 2026 Auction : रिकी पॉन्टिंग धोका देऊन गेला, ऑक्शनसाठी शेवटच्या क्षणी प्रिती झिंटाने बोलवला धुरंधर!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Shreyas Iyer On IPL 2026 Auction Table : पंजाब किंग्जला श्रेयस अय्यरच्या मार्गदर्शनासाठी जास्त खेळाडू रिटेन केल्यामुळे, केवळ 4 खेळाडू खरेदी करायचे आहेत, ज्यात जास्तीत जास्त 2 परदेशी खेळाडू असू शकतात.
advertisement
1/5

मागील आयपीएल हंगामात उपविजेत्या राहिलेल्या पंजाब किंग्जसाठी यंदाचा लिलाव महत्त्वाचा असणार आहे. आगामी ऑक्शनसाठी आता सर्वांची उत्सकुता वाढत असताना पंजाब किंग्जला मात्र मोठा धक्का बसला आहे.
advertisement
2/5
पंजाब किंग्जचा स्टार कोच आणि ऑस्ट्रेलियाला एकदा दोनदा नाही तर चार वेळा वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या रिकी पॉन्टिंगने लिलावास येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे प्रिती झिंटाला मोठा धक्का बसलाय.
advertisement
3/5
पॉन्टिंग सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या अ‍ॅशेस मालिकेसाठी समालोचक पॅनेलचा भाग आहे. तो मालिकेच्या प्रसारक, 7 क्रिकेटशी करारबद्ध आहे आणि म्हणूनच तो या लिलावात सहभागी होणार नाही.
advertisement
4/5
तब्बल 21 खेळाडू रिटेन केल्यानंतर पंजाब किंग्सकडे लिलावासाठी 11.50 कोटी इतकी रक्कम शिल्लक आहे. अशातच आता पंजाब किंग्जने नवा धुरंधर खास लिलावासाठी बोलवला आहे.
advertisement
5/5
दरम्यान, हा धुरंधर दुसरा तिसरा कुणी नसून कॅप्टन श्रेयस अय्यर आहे. श्रेयस पंजाबच्या स्कॉडसोबत सामील झालाय. पंजाब किंग्जने धुरंधरचं टायटल सॉन्ग टाकून त्याचा व्हिडीओ देखील शेअर केलाय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 Auction : रिकी पॉन्टिंग धोका देऊन गेला, ऑक्शनसाठी शेवटच्या क्षणी प्रिती झिंटाने बोलवला धुरंधर!