शून्यातून उभं केलं 10 वर्षांचं साम्राज्य, एका 'हिरव्या पोळी'ने बदललं नशीब! काय आहे 'प्रसिका'ची Inside Story?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Inside Story of 'Prasika': ज्या प्रेक्षकांनी त्यांना शून्यातून विश्व निर्माण करताना पाहिलं, त्याच प्रसाद आणि दीपिकाचे सर्व प्रमुख सोशल मीडिया अकाउंट्स अचानक सस्पेंड करण्यात आले आहेत.
advertisement
1/14

"नमस्कार मंडळी, सर्वांनी जेवायला या!" हा आवाज कानावर पडला की डोळ्यांसमोर येतो तो दीपिकाचं वेगवेगळ्या पदार्थांनी भरलेलं ताट आणि कॅमेऱ्यामागून प्रेमळ टिप्पणी करणारा प्रसाद.
advertisement
2/14
महाराष्ट्रातील घराघरात आणि खवय्यांच्या मोबाईलमध्ये हक्काचं स्थान मिळवणारी 'प्रसिका' ही जोडी सध्या एका मोठ्या संकटात सापडली आहे.
advertisement
3/14
ज्या प्रेक्षकांनी त्यांना शून्यातून विश्व निर्माण करताना पाहिलं, त्याच प्रसाद आणि दीपिकाचे सर्व प्रमुख सोशल मीडिया अकाउंट्स अचानक सस्पेंड करण्यात आले आहेत.
advertisement
4/14
गेल्या १० वर्षांपासून अविरतपणे मनोरंजन करणाऱ्या या जोडीची इन्स्टाग्राम, फेसबुक, युट्युब आणि ट्विटरवरील व्हेरिफाईड अकाउंट्स कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बंद करण्यात आली आहेत.
advertisement
5/14
लाखो फॉलोअर्स, हजारो व्हिडिओ आणि त्याहूनही जास्त असलेल्या प्रेक्षकांच्या आठवणी एका क्षणात डिजिटल ब्लॅकआऊटमध्ये गेल्या आहेत. प्रसादने स्वतः एका भावूक पोस्टद्वारे ही माहिती दिली असून, या कारवाईमुळे तो आणि दीपिका दोघेही पुरते हादरले आहेत.
advertisement
6/14
प्रसाद आणि दीपिकाचा हा प्रवास २०१४ मध्ये 'Ur Indian Consumer' पासून सुरू झाला. खऱ्या अर्थाने भारतात 'व्ह्लॉगिंग'ची लाट येण्याआधीच या जोडीने आपल्या दैनंदिन जीवनातील गमतीजमती शेअर करायला सुरुवात केली होती.
advertisement
7/14
टिकटॉकवर तर त्यांनी अवघ्या ६ महिन्यांत १० लाख फॉलोअर्सचा टप्पा पार करून इतिहास रचला होता. त्यांची "लंच विथ प्रसिका" ही सिरीज तर सोशल मीडियावरील एक वेगळाच 'कंटेंट जॉनर' बनली. साध्या घरगुती जेवणाचं ताट इतकं व्हायरल होऊ शकतं, हे त्यांनी जगाला दाखवून दिलं.
advertisement
8/14
एकदा खिडकीत बसून जेवणाऱ्या दीपिकाच्या ताटातील हिरवी पोळी पाहून लोक थक्क झाले. त्यानंतर त्यांनी बीटची 'लाल' पोळी बनवली आणि बघता बघता ही जोडी "रंगीबेरंगी पोळ्या बनवणारे कपल" म्हणून प्रसिद्ध झाली.
advertisement
9/14
प्रसिकाची लोकप्रियता इतकी दांडगी आहे की, 'Upstox' सारख्या मोठ्या ब्रँड्सनी त्यांना खास आयपीएल मॅचसाठी आमंत्रित केलं होतं.
advertisement
10/14
तिथेही त्यांच्या व्हिडिओंनी ५० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळवले. त्यांनी शाळा, कॉलेज आणि ऑफिसला जाणाऱ्यांसाठी 'लंचबॉक्स विथ प्रसिका' ही सिरीजही सुरू केली होती.
advertisement
11/14
नवरात्रीच्या उत्सवाच्या वेळी तर त्यांनी कमालच केली. त्यांनी नवरात्रीच्या नऊ रंगांनुसार नऊ दिवसांसाठी खास थाळी तयार केल्या होत्या. त्यांच्या या हटके आयडियामुळे प्रेक्षक नेहमीच त्यांच्यात गुंतून राहिले.
advertisement
12/14
अशातच, प्रसिकाच्या नवनवे पदार्थ लोकांपर्यंत पोहोचण्याच्या प्रवासात आता खंड पडल्याचं पाहायला मिळतंय. त्यांच्या डिजिटल अस्तित्वावर घाला घातला गेला आहे.
advertisement
13/14
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी ही कारवाई का केली, याचं अधिकृत कारण अद्याप मिळालेलं नाही. मात्र, प्रसाद आणि दीपिका शांत बसलेले नाहीत.
advertisement
14/14
त्यांनी तांत्रिक आणि कायदेशीर मार्गाने आपले अकाउंट्स परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या कठीण काळात त्यांचे हजारो चाहते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
शून्यातून उभं केलं 10 वर्षांचं साम्राज्य, एका 'हिरव्या पोळी'ने बदललं नशीब! काय आहे 'प्रसिका'ची Inside Story?