TRENDING:

आदेश बांदेकरांनंतर प्रसाद ओकही झाला सासरा, थाटात पार पडला मुलाचा साखरपुडा, PHOTO

Last Updated:
Prasad Oak Son Engagement : अभिनेते आदेश बांदेकर यांच्यानंतर अभिनेता प्रसाद ओकही सासरा झाला आहे. प्रसाद ओकच्या मुलाचा नुकताच साखरपुडा झाला.
advertisement
1/11
आदेश बांदेकरांनंतर प्रसाद ओकही झाला सासरा, थाटात पार पडला मुलाचा साखरपुडा, PHOTO
मराठी मनोरंजन विश्वात गेल्या अनेक महिन्यांपासून लग्नाचे सनई चौघडे वाजत आहेत. काही दिवसांआधीच अभिनेते आदेश बांदेकर यांच्या घरी सून आली. आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर याने अभिनेत्री पूजा बिरारीसोबत लग्न केलं.
advertisement
2/11
[caption id="attachment_1545171" align="aligncenter" width="1280"] लेकाच्या लग्नानंतर आदेश बांदेकर आता सासऱ्यांच्या रोलमध्ये आहेत. त्यानंतर आता अभिनेता प्रसाद ओक देखील सासरा झाला आहे.</dd> <dd>[/caption]
advertisement
3/11
प्रसाद ओकच्या मोठ्या मुलाचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला. प्रसादच्या मुलाच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
4/11
प्रसाद ओकचा मोठा मुलगा सार्थक ओक याने साखरपुडा केला आहे. सार्थकची होणारी बायको कोण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही पण साखरपुड्यात दोघेही खूप सुंदर दिसत होते.
advertisement
5/11
प्रसाद ओक आणि त्याची बायको मंजिरी ओक हे मुलाच्या साखरपुड्यात अत्यंत खुश होते. दोघांनी मुलाच्या साखरपुड्याची बातमी देऊन चाहत्यांनाही आश्चर्यचकीत केलं आहे.
advertisement
6/11
प्रसाद ओकच्या मुलाच्या साखरपुड्याला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेता समीर चौघुले, अमृता खानविलकर आणि तिची आई तसंच अभिनेता स्वप्निल जोशीनं देखील साखरपुड्याला हजेरी लावली होती.
advertisement
7/11
प्रसाद ओकचा मोठा मुलगा सार्थक आणि दुसऱ्या मुलाचं नाव मयांक असं आहे. दोघेही सोशल मीडियावर फार सक्रीय नाहीत. अनेकदा प्रसाद आणि मंजिरी मुलांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
advertisement
8/11
आता प्रसादची होणारी सून आहे कोण? करते काय? हे जाणून घेण्याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागून आहे.
advertisement
9/11
प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांची स्वत:चं युट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. तिथे व्लॉग आणि कॉमेडी व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पसंती मिळत असते. 
advertisement
10/11
प्रसाद ओकच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचं झाल्यास तो सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये हास्यरसिक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. 
advertisement
11/11
त्याचा 'रीलस्टार', 'वडापाव', 'गुलकंद' हे सिनेमे काही महिन्यांआधी रिलीज झाले. यातील गुलकंद या सिनेमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आदेश बांदेकरांनंतर प्रसाद ओकही झाला सासरा, थाटात पार पडला मुलाचा साखरपुडा, PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल