TRENDING:

5 मॅचमध्ये फक्त 1 विकेट! टीम इंडियाचा ऑलराऊंडर काय कामाचा? जागा घेण्यासाठी स्टार खेळाडू 'देव पाण्यात ठेऊन बसला'

Last Updated:
Ravindra jadeja performace retirement : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर आता रविंद्र जडेजा गेल्या काही दिवसांपासून चांगली कामगिरी करत नसल्याचं पहायला मिळत आहे.
advertisement
1/6
5 मॅचमध्ये फक्त 1 विकेट! टीम इंडियाचा ऑलराऊंडर काय कामाचा?
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सिरीजमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता टीम इंडियाच्या कामगिरीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. टीम इंडियाच्या पराभवाला कारणीभूत ठरतोय ऑलराऊंडर...
advertisement
2/6
न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमधली रविंद्र जडेजाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. रवींद्र जडेजाला संपूर्ण सीरिजमध्ये एकही विकेट मिळाली नाही. तसंच तिन्ही सामन्यांमध्ये मिळून जडेजाला बॅटिंगमध्येही 50 रनही करता आल्या नाहीत.
advertisement
3/6
ऑलराऊंडर असलेल्या जडेजाला न्यूझीलंडविरुद्धच्या पूर्ण सीरिजमध्ये एकही विकेट घेता आली नाही. तर 3 सामन्यांमध्ये त्याने फक्त 43 रन केल्या आहेत. पहिल्या सामन्यात त्याने 4 रन, दुसऱ्या सामन्यात 27 आणि तिसऱ्या सामन्यात 12 रन केले.
advertisement
4/6
जडेजाने टी-ट्वेंटीमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे आता तो फक्त वनडे आणि टेस्ट क्रिकेट खेळतो. अशातच जडेजाची जागा घेण्यासाठी टीम इंडियाचा बापू तयार झाला आहे. अक्षर पटेल आगामी वनडे मालिकेत जड्डूची जागा घेऊ शकतो.
advertisement
5/6
दरम्यान, अक्षर पटेलने संधी मिळेल तिथं स्वत:ला सिद्ध केलं आहे. जडेजाने जर वनडे फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली तर अक्षर पटेलला संधी मिळण्याची शक्यता आहे. आश्विनने देखील यावर वक्तव्य केलं होतं.
advertisement
6/6
अश्विनच्या मते, वनडे क्रिकेटमध्ये जडेजासाठी हा कठीण काळ आहे, कारण जर त्याने मोठी चूक केली तर अक्षर पटेल त्याची जागा घेण्यास तयार आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपासून जडेजाची कामगिरी खराब झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
5 मॅचमध्ये फक्त 1 विकेट! टीम इंडियाचा ऑलराऊंडर काय कामाचा? जागा घेण्यासाठी स्टार खेळाडू 'देव पाण्यात ठेऊन बसला'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल