TRENDING:

Prashant Damle : प्रशांत दामलेंचा नवा विक्रम! तीन वर्षात मोडला स्वत:चाच रेकॉर्ड, महाराष्ट्रभरातून होतंय कौतुक

Last Updated:
Prashant Damle : विक्रमवीर प्रशांत दामले यांनी नवा विक्रम केला आहे. महाराष्ट्रभर लाडक्या विनोदवीराचा आता कौतुक होत आहे.
advertisement
1/7
प्रशांत दामलेंचा नवा विक्रम! तीन वर्षात मोडला स्वत:चाच रेकॉर्ड
अभिनेते प्रशांत दामले यांनी गेल्या 42 वर्षांत रंगभूमीवर आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे. 1983 पासून ते रंगभूमीशी जोडले गेले आहेत. त्यांनी नुकताच 13 हजार 333 वा प्रयोग करत आणखी एक विक्रम केला आहे. हा विक्रम करण्यासह समाजभान जपतानाही ते दिसून आले आहेत.
advertisement
2/7
अभिनेता आणि नाट्यनिर्माते प्रशांत दामले यांनी एक व्हिडीओ शेअर करत मदतीचा हात उचलला असल्याची चाहत्यांना माहिती दिली आहे. प्रशांत दामलेंनी लिहिलं आहे,"माझ्या कारकीर्दीतील 13,333 वा प्रयोग 16 नोव्हेंबर रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला. आजवर माझ्या प्रत्येक प्रयोगाला जसा रसिकप्रेक्षकांचा प्रतिसाद असतो तसाच उदंड प्रतिसाद आणि प्रेम मला यावेळीही अनुभवता आलं".
advertisement
3/7
प्रशांत दामले यांनी लिहिलं आहे,"या विशेष कार्यक्रमावेळी एक 'खारीचा वाटा' म्हणून माझ्याकडून आणि समस्त नाट्यरसिकांच्या वतीने महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्तांना 13 लाख 333 रुपयांची मदतही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे या विशेष सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आभार!".
advertisement
4/7
प्रशांत दामले यांना रंगभूमीचा 'विक्रमादित्य' म्हटलं जातं. पण आता आपत्तीग्रस्तांना मोठी मदत करत त्यांनी कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. प्रशांत दामले यांनी याआधी 6 नोव्हेंबर 2022 रोजी 12,500 प्रयोग करत रेकॉर्ड केला होता. पण आता तीन वर्षांत त्यांनी स्वत:चाच रेकॉर्ड मोडला आहे. नुकताच पुणेकरांच्या साथीने मराठी रंगभूमीवर अनोखा विक्रमी सोहळा पार पडला. प्रशांत दामलेंच्या 'शिकायला गेलो एक' या नाटकाचा 13 हजार 333 वा प्रयोग पार पडला आहे. हा प्रयोग करत दामलेंनी स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
advertisement
5/7
प्रशांत दामले हे 'प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन'च्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवीत असतात. मराठी नाटक, मराठी रंगभूमीसाठी ते कायमच झटत असतात.
advertisement
6/7
प्रशांत दामले यांची टूरटूर, मोरुची मावशी, ब्रह्मचारी, गेला माधव कुणीकडे, एका लग्नाची गोष्ट, जादू तेरी नजर, प्रियतमा, बहुरुपी, साखर खाल्लेला माणूस आणि शिकायला गेलो एक, अशा अनेक नाटकांच्या माध्यमातून प्रशांत दामले यांनी रंगभूमी गाजवली आहे. गेल्या चार दशकांत त्यांना नाट्यरसिकांची नस चांगलीच कळली आहे.
advertisement
7/7
प्रशांत दामले यांच्या नावे आजवर अनेक रेकॉर्ड्स आहेत. लिम्का बुक ऑफ रेकॉड्समध्ये तब्बल पाच वेळा त्यांच्या नावाची नोदं करण्यात आली आहे. आजवर अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येतात. आता त्यांच्या आगामी नाटकाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prashant Damle : प्रशांत दामलेंचा नवा विक्रम! तीन वर्षात मोडला स्वत:चाच रेकॉर्ड, महाराष्ट्रभरातून होतंय कौतुक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल