TRENDING:

प्रिया बापटच्या नाटकाच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, वयाच्या 42 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Last Updated:
Marathi Famous Actor Director Death : प्रिया बापटच्या प्रसिद्ध नाटकाच्या दिग्दर्शकाचं निधन झालं आहे. वयाच्या 42 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे.
advertisement
1/7
प्रिया बापटच्या प्रसिद्ध नाटकाच्या दिग्दर्शकाचं निधन
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक रजणित पाटील याचे निधन झाले आहे. वयाच्या 42 व्या वर्षी मुंबईत त्याने अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं समोर आलं आहे. कोल्हापूरमध्ये राहत्या घरी रणजितवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
advertisement
2/7
रणजित पाटीलच्या निधनाने मराठी मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून रणजीतच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.
advertisement
3/7
अनेक नवोदित कलाकार घडवण्यात रणजित पाटीलचा मोलाचा वाटा होता. रुपारेल कॉलेजमध्ये असताना रजणीतला अभिनयाची आवड लागली. मुंबईतील अनेक एकांकिका स्पर्धा रणजीत पाटीलने गाजवल्या आहेत. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर रुपारेल आणि रुईया कॉलेजमधील नाट्यविभागात एकांकिका बसवण्याचं काम रणजीत पाटील करत होता.
advertisement
4/7
रणजित पाटीलच्या दिग्दर्शनात कायम नाविन्य राहिलं आहे. चौकट मोडून काढण्याचा प्रयत्न त्याने आपल्या दिग्दर्शनात केला आहे. त्याच्या दिग्दर्शनात माणसांच्या भावनांना केंद्रस्थानी ठेवणारी मांडणी आढळते. त्यामुळे त्याची प्रत्येक कलाकृती मनोरंजनाचं माध्यम न राहता समजाला विचार करायला भाग पाडते.
advertisement
5/7
रणजित पाटीलने अनेकांना नाटक शिकवलं आहे. नाटकातील बारकाव्यांचा तो खोल अभ्यास करत असे. रणजितच्या तोंडी नेहमी 'प्रोसेस महत्त्वाची आहे. बिनचूक प्रयोग करा' हे बोल असायचे. त्यातून अनेकांना प्रेरणा मिळत असे.
advertisement
6/7
प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या जर तर ची गोष्ट' या सध्या रंगभूमीवर गाजत असलेल्या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा रणजित पाटीने सांभाळली आहे. नुकताच या नाटकाचा 300 वा प्रयोग पार पडला.
advertisement
7/7
'डबल लाईफ' या मराठी नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील रणजित पाटीलने सांभाळली आहे. तसेच अनेक मराठी मालिका आणि एकांकिका आणि प्रायोगिक नाटकांचं दिग्दर्शन रणजित पाटीलने केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्रिया बापटच्या नाटकाच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, वयाच्या 42 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल