TRENDING:

15 वर्षांचा संसार, तरी प्रियाला हवं आहे दीपिका-रणवीरवालं प्रेम! उमेशला पाठवते त्यांचे 'ते'वाले व्हिडीओ

Last Updated:
Priya Bapat-Umesh Kamat : अभिनेत्री प्रिया बापट नवरा उमेशला दीपिका आणि रणवीरचे व्हिडीओ पाठवते. त्यामागचं कारणही तसंच गोड आहे.
advertisement
1/8
15 वर्षांचा संसार, तरी प्रियाला हवं आहे दीपिका-रणवीरवालं प्रेम! उमेशला पाठवते त्यांचे 'ते'वाले व्हिडीओ
उमेश कामत आणि प्रिया बापट हे मराठी इंडस्ट्रीतील आयडिअल कपलपैकी एक आहेत. दोघांचाही मोठा फॅनबेस आहे. दोघांना मालिका, सिनेमा, नाटकांत एकत्र काम केलं आहे. ही जोडी आता ओटीटीवर प्लॅटफॉर्मवरही प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. प्रियाने ओटीटीवर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 
advertisement
2/8
उमेश आणि प्रिया यांच्या कामाबरोबरच त्यांच्या प्रेमाचीही नेहमीच चर्चेत असते. जवळपास 8 वर्षांनी मोठ्या असलेल्या उमेशला प्रपोज करून प्रियाने त्याच्याशी लग्न केलं. काही वर्ष अफेअर आणि आता 15 वर्षांचा संसार ते करत आहेत. 
advertisement
3/8
15 वर्षांच्या संसारात अनेक चढ उतार आले पण प्रियाला उमेशकडून आजही दीपिका-रणवीर यांच्यासारखं प्रेम करून घ्यायचं आहे. ती अनेकदा उमेशला दीपिका-रणवीरचे ते व्हिडीओ शेअर करत असते. नुकत्याच एका मुलाखतीत प्रियाने हे सांगितलं. 
advertisement
4/8
प्रिया म्हणाली, "अनेकांना प्रत्येक गोष्ट खूप अफेक्ट होते. खूप गोष्टी तुम्ही इमोशनली घेता. आयुष्यातील प्रत्येक टप्पा. तशी मीपण आहे. ज्या गोष्टी रमाला जाणवतात त्या मला जाणवतात."
advertisement
5/8
"माझ्या आणि उमेशमध्ये हे खूप वेळा संभाषण झालंय की, तू रस्त्यातून जाताना माझा का हात नाही पकडत. मी त्याला दीपिका-रणवीरचे व्हिडीओ पाठवूनपण सांगते की हे बघ कसे करतात पब्लिकली, तुला काय होतं वगैरे."
advertisement
6/8
"पण स्वभावात तो तसा माणूस नाहीये. त्यामुळे तो ते कधीच करत नाही. त्याला त्याच्यात काही अपूर्ण आहे वाटत नाही. माझ्यासाठी असं होतं की प्रेम आणि लग्न नवं होतं तेव्हा सहाजिकच त्या गोष्टी होतात."
advertisement
7/8
"ज्यावेळेस तुम्हाला त्याची सवय होते तेव्हा चांगल्या अर्थाने तुम्ही एकमेकांना गृहीत धरायला लागता. मग अशावेळी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी एक्सप्रेस करण्याची गरज वाटत नाही, गरज उरतही नाही. पण तुम्ही कधी कधी तुमच्या इमोशनल फेजेसमध्ये असता की तुम्हाला ते व्यक्त होणं त्यावेळेस हवं असतं."
advertisement
8/8
प्रिया आणि उमेश यांची 'हे काय नवीन' ही नवी मराठी वेब सीरिज झी 5 मराठीवर रिलीज झाली आहे. दोघांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
15 वर्षांचा संसार, तरी प्रियाला हवं आहे दीपिका-रणवीरवालं प्रेम! उमेशला पाठवते त्यांचे 'ते'वाले व्हिडीओ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल