Priya Bapat : दुसरी पण मुलगीच! प्रिया बापटच्या जन्मावेळी नाराज झाली आजी, लेकीसाठी वडिलांनी लढवली भन्नाट शक्कल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Priya Bapat Name Story : प्रिया बापटला एक मोठी बहीण आहे. एका मुलाखतीत तिने तिच्या जन्मावेळी घडलेला एक खास किस्सा सांगितला. प्रियाच्या जन्मानंतर तिच्या आजीने थोडी नकारात्मक प्रतिक्रिया दिली होती.
advertisement
1/7

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापट आता केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर बॉलिवूडमध्येही आपलं नाव कमावत आहे.
advertisement
2/7
बालपणापासूनच अभिनयाच्या दुनियेत आलेल्या प्रियाने मालिका, चित्रपट, रंगभूमी आणि आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही तिच्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
advertisement
3/7
तिच्या या यशामागे तिच्या कुटुंबाचा मोठा हात आहे. ती वेळोवेळी आपल्या कुटुंबाबद्दलच्या पोस्ट शेअर करत असते. पण तिच्या जन्मावेळी एक अशी घटना घडली होती, जी आजही तिच्या मनात आहे.
advertisement
4/7
प्रिया बापटला एक मोठी बहीण आहे. एका मुलाखतीत तिने तिच्या जन्मावेळी घडलेला एक खास किस्सा सांगितला. प्रियाच्या जन्मानंतर तिच्या आजीने थोडी नकारात्मक प्रतिक्रिया दिली होती, ती म्हणाली, “दुसरी पण मुलगीच झाली!”
advertisement
5/7
त्यावेळी प्रियाच्या काकांना दोन मुलं होती, तर तिच्या वडिलांना दोन मुली होत्या. भविष्यात प्रियाला अशा वागणुकीचा सामना करावा लागू नये, असं तिच्या वडिलांना वाटलं, म्हणून त्यांनी तिचं नाव ‘प्रिया’ ठेवलं. ‘जी सगळ्यांना प्रिय असेल’ या विचाराने त्यांनी हे नाव ठेवलं होतं.
advertisement
6/7
प्रियाच्या बाबांनी ज्या हेतूने तिचं नाव ठेवलं होतं, ते खरं ठरलं. ती आज केवळ कुटुंबाचीच नाही, तर सगळ्या प्रेक्षकांची प्रिय आहे. तिने तिच्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकली आहेत.
advertisement
7/7
नुकताच प्रियाचा ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात तिचा नवरा उमेश कामत, अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ आणि डॉ. गिरीश ओक यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाने ९ दिवसांतच बॉक्स ऑफिसवर १ कोटींची कमाई केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Priya Bapat : दुसरी पण मुलगीच! प्रिया बापटच्या जन्मावेळी नाराज झाली आजी, लेकीसाठी वडिलांनी लढवली भन्नाट शक्कल