Radha Patil Struggle : बॅक डान्सर ते लीड रोल! अंबरनाथची राधा पाटिल कशी झाली कातिलो की कातिल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Radha Patil Struggle : डान्सर राधा पाटिलला कातिलो की कातिले राधा पाटिल असं म्हणतात. पण राधा पाटिल आली कुठून? तिची सुरुवात कुठून झाली?
advertisement
1/9

बिग बॉस मराठी 6 मधून दुसऱ्या आठवड्यात आऊट झालेली राधा पाटिल सध्या चर्चेत आहे. डान्सर राधा पाटिलने तिच्या डान्सने महाराष्ट्राला वेड लावलं होतं. बिग बॉसच्या घरात एक वेगळी राधा पाटिल पाहायला मिळाली. राधीने घरात तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या. राधा पाटिलकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन प्रेक्षकांना सापडला.
advertisement
2/9
राधा पाटिल ही फक्त एक स्टेज डान्सर म्हणून सर्वांना माहिती होतं. पण तिचं लावणीवर असलेलं प्रेम, ती माणूस म्हणून कशी आहे हे देखील बिग बॉसमध्ये पाहायला मिळालं. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना राधाला ट्रोल करणारे देखील अनेक आहेत.
advertisement
3/9
राधा पाटिलला बाहेर कातिलो की कातिले राधा पाटिल असं म्हणतात. पण राधा पाटिल आली कुठून? तिची सुरुवात कुठून झाली? हे माहिती आहे का? राधाने नुकतंच एका मुलाखतीत बोलताना तिच्या स्ट्रगलविषयी सांगितलं.
advertisement
4/9
तारांगणला दिलेल्या मुलाखतीत बोलताना राधा म्हणाली, "मी छोट्या अंबरनाथमधून आहे. तिथून मी सुरुवात केली. पाठीमागे कोरस, त्यानंतर लीड. खूप स्ट्रगल केलाय मी इथपर्यंत येण्यासाठी."
advertisement
5/9
"जे लोक ट्रोल करतात त्यावरून तुम्ही माझा स्ट्रगल समजू शकत नाही. तुम्ही घरात बसून फक्त मला ट्रोलच करू शकता. स्ट्रगल करा तुम्हीही पुढे जाल."
advertisement
6/9
राधा पाटिल ही पहिल्यांदा गौतमी पाटिल आणि हिंदवी पाटिल यांच्या ग्रुपमध्ये डान्स करत होती. तिघीही एकमेकींच्या अत्यंत घट्ट मैत्रिणी होत्या.
advertisement
7/9
हिंदवी पाटिलने एका मुलाखतीत बोलताना त्यांच्या मैत्रीबद्दल सांगितलं होतं. हिंदवी, गौतमी आणि राधा पाटिल यांचं करिअर एकत्रच सुरू झालं. तिघीही स्कुटीवरून शोसाठी प्रवास करायच्या.
advertisement
8/9
पण काही कारणांमुळे तिघींचा ग्रुप फुटला आणि तिघींना आपला नवा ग्रुप काढून वेगळे शो करायला सुरुवात केली. आता राधा पाटिल आणि गौतमी पाटिल यांच्यात जोरदार भांडणं आहेत. दोघी एकमेकींना टोला लगावण्याची एकही संधी सोडत नाहीत.
advertisement
9/9
तर दुसरीकडे हिंदवी पाटिल आणि राधा पाटिल यांचं नातं खूप चांगलं आहे. बिग बॉसमध्ये जाण्याआधी हिंदवीने राधाला गाइड केलं होतं. राधाच्या आधी हिंदवी बिग बॉसमध्ये जाणार होती मात्र सिनेमाच्या शूटींगमुळे ती जाऊ शकली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Radha Patil Struggle : बॅक डान्सर ते लीड रोल! अंबरनाथची राधा पाटिल कशी झाली कातिलो की कातिल