Tips To Look Tall : हिल्सवर चालता येत नाही, पण उंचही दिसायचंय? या टिप्स फॉलो करा, मिळेल परफेक्ट लूक!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to look heighted without heels : एखादे फंक्शन असेल किंवा आता व्हॅलेंटाईन डेही जवळ आला आहे. तेव्हा आपल्याला परफेक्ट दिसायचं असतं. बऱ्याच मुलींना उंच दिसायला आवडतं मात्र त्यांची उंची कमी असते. अशा मुलींना हिल्स घालण्याव्यतिरिक्त कोणताच पर्याय उरत नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही हिल्स न घालताही उंच दिसाल.
advertisement
1/7

काही मुलींना सवयीने हिल्स वापरणं सोपं जातं. पण जर पहिलीच वेळ असेल किंवा क्वचितच कधीतरी हिल्स घालण्याची वेळ आली तर बऱ्याच मुलींना प्रॉब्लेम होतो. अशावेळी उंच दिसण्यासाठी हिल्सव्यतिरिक्तही काही पर्याय असतील तर? चला पाहूया काही सोप्या टिप्स..
advertisement
2/7
कपड्यांचा रंग आणि डिझाइनची योग्य निवड : उंच दिसण्यासाठी काही विशेष प्रकारचे कपडे तुमची मदत करू शकतात. उंच दिसण्यासाठी उभ्या रेषा असलेले कपडे घाला. पट्टेदार कुर्ता, पँट किंवा ड्रेस तुमचे शरीर उंच भासवू शकतात. मोनोक्रोम पद्धतीचा म्हणजे एकाच रंगाचा ड्रेस घातल्याने तुम्ही उंच दिसू शकता. तुमची उंची कमी असेल तर जास्त रंग असलेले कपडे टाळा.
advertisement
3/7
फिटिंग महत्त्वाची : उंची कमी असेल तर तुमच्या कपड्यांचे फिटिंग योग्य असणे खूप आवश्यक असते. कमी उंचीच्या लोकांनी खूप सैल किंवा खूप घट्ट कपडे घालू नये. या कपड्यांमुळे तुमची उंची आणखी कमी दिसू शकते. त्यामुळे हाय वेस्ट पॅन्ट, स्कर्ट किंवा पलाझो घालावे, हे तुमच्या पायांना अधिक लांब भासवतात. ज्यामुळे साहजिकच तुम्ही काहीसे उंच दिसू शकता.
advertisement
4/7
लहान टॉप्स टाळा : उंची कमी असल्यास शक्यतो लहान साईजचे कपडे टाळावे. उंची कमी असलेल्या महिलांनी क्रॉप टॉप किंवा खूप लहान कुर्ता घालणे टाळावे. कंबरेपेक्षा थोडे खाली असलेले टॉप निवडा. त्याचप्रमाणे जास्त लांबीचे कुर्ते किंवा ट्यूनिक्स देखील तुमची उंची कमी दाखवू शकतात. म्हणून हेही टाळा आणि योग्य साईजमध्ये कपडे निवडा.
advertisement
5/7
अॅक्सेसरीजची मदत घ्या : बऱ्याच महिलांना मोठ्या बॅग्ज आणि हेव्ही दागिन्यांची आवड असते.. मात्र तुमची उंची कमी असल्यास तुम्ही लहान बॅग्ज, पातळ बेल्ट आणि आकर्षक दागिने घालावे. याने तुमचा लूक आणखी सुंदर होतो. त्याचप्रमाणे लांब कानातलेही तुमची मदत करू शकतात.
advertisement
6/7
पोश्चर आणि आत्मविश्वास ठरवतात सर्वकाही : सर्व फॅशन टिप्स फॉलो कारण किंवा अगदी हिल्स घालणंही तोपर्यंत तुमचा लूक रॉयल बनावट नाहीत, जोपर्यंत तुमचा कॉन्फिडन्स जास्त नसेल. तुमची उंची तुमचे कपडे, दागिने कसे असो.. शेवटी तुम्ही ते किती आत्मविश्वासाने मिरवता यावरच सर्वकाही अवलंबून असतं. म्हणून तुमचे पोश्चर आणि आत्मविश्वास योग्य ठेवा.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tips To Look Tall : हिल्सवर चालता येत नाही, पण उंचही दिसायचंय? या टिप्स फॉलो करा, मिळेल परफेक्ट लूक!